Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

February 28, 2026
2
  • राजकीय

February 27, 2026
कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

February 17, 2026
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

February 17, 2026
5
  • ताज्या बातम्या

February 17, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • प्रेस नोट
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

प्रेस नोट

लोकाधार December 29, 2025

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांकडून SRA ची “नो ड्यू सर्टिफिकेट”सक्तीची करण्यात यावी — सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांची मागणी

ठाणे.
सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी ठाणे येथील स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी (SRA) तसेच निवडणूक आयोगाला निवेदन देऊन ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी दाखल करणाऱ्या कोणत्याही डेव्हलपरकडून “नो ड्यू सर्टिफिकेट” अनिवार्य करण्याची मागणी केली आहे.
आपल्या पत्रात अजय जेया यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे की,जे डेव्हलपर SRA योजनेनुसार झोपडपट्टीवासीयांना देय असलेले भाडे ( ट्रांझिट रेंट ) भरत नाहीत,अशा डेव्हलपरांना निवडणूक लढविण्याची परवानगी देण्यात येऊ नये. SRA कायद्यानुसार वेळेवर भाडे भरणे ही त्यांची कायदेशीर व नैतिक जबाबदारी असताना अशा नियमभंग करणाऱ्या डेव्हलपरांना निवडणुका लढण्याची मुभा देणे ही झोपडपट्टीवासीयांवरील अन्यायकारक व प्रशासनिकदृष्ट्या चुकीची बाब असल्याचे अजय जेया यांनी लक्ष वेधले SRA योजने अंतर्गत राहणाऱ्यांनी शासनाच्या सूचनेनुसार घरे रिकामी केली असून प्रकल्पावरील विश्वास दाखवला,परंतु अनेक विकासकांनी झोपडपट्टी वासीयांचे वेळेवर भाडे न दिल्याने कुटुंबांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.SRA कडून नोटिसा देऊनही भाडे न भरण्याची परिस्थिती कायम असून, झोपडपट्टीवासीयांनी नियमांचे पालन करून घर रिकामे केले असताना प्रकल्पाचा फायदा घेत असलेले बिल्डर मात्र आपली मूलभूत जबाबदारी टाळत आहेत,असेही जेया यांनी म्हटले.ते पुढे म्हणाले की ठाणे महापालिका स्वतःच्या सर्व विभागांकडून—जसे की पाणी कर,मालमत्ता कर,कचरा कर, तसेच प्रलंबित वाहन दंड—यांचे “नो ड्यू सर्टिफिकेट” घेतल्याशिवाय कोणत्याही उमेदवाराला निवडणूक लढू देत नाही. मग SRA अंतर्गत विकास कामे करणाऱ्या व मोठ्या जबाबदाऱ्या असलेल्या डेव्हलपरांना हेच नियम लागू का केले जात नाहीत?एखादा डेव्हलपर झोपडपट्टीवासीयांचे भाडे वेळेत देत नसेल थकबाकी असलेल्या डेव्हलपरांना काळया यादीत टाकण्यात यावे तो जनतेचा प्रतिनिधी होऊ शकत नाही आणि निवडून आल्यानंतर तो आपल्या पदाचा गैरवापर करण्याची शक्यता अधिक असल्याचे जेया यांनी स्पष्ट केले.
ही बाब सार्वजनिक हिताची असल्याचे नमूद करत,अजय जेया यांनी SRA ला विनंती केली आहे की सर्व उमेदवार डेव्हलपरांची झोपडपट्टी वासियांचे थकविलेले भाडे तातडीने वसूल करून कारवाई करावी,SRA नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डेव्हलपरांची यादी निवडणूक आयोगाला पाठवावी आणि सर्व थकीत देयकांची पूर्णपणे भरपाई झाल्याशिवाय अशा उमेदवारांना निवडणूक लढण्यास प्रतिबंध करावा.
अजय जेया यांनी स्पष्ट केले. SRA ही जनतेच्या कल्याणाची जबाबदारी असलेली सरकारी संस्था आहे,त्यामुळे झोपडपट्टीवासीयांच्या हक्कांचे संरक्षण करून न्याय मिळवून देणे ही SRA ची प्राथमिक जबाबदारी आहे आणि निवडणुकीत त्यांनी केवळ प्रामाणिक व नियमांचे पालन करणाऱ्या उमेदवारांनाच संधी मिळाली पाहिजे.

Post navigation

Previous: हजारो मतदारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी भरले अर्ज
Next: बिनविरोध निवडीने मतदारांची घोर फसवणूक !

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×