Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के 1
  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

April 16, 2026
प्रेस नोट 2
  • Blog

प्रेस नोट

April 10, 2026
ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा.. 3
  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

April 10, 2026
आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार 4
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

April 7, 2026
ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले.. 5
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले..

April 3, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026

ठाणे – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष किरण रामकृष्ण पाटील यांच्या पुढाकाराने मल्लखांब स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून मराठी भाषा आणि संस्कृतीसोबतच पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.
या स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मल्लखांब या पारंपरिक क्रीडा प्रकारातील ताकद, संतुलन आणि कौशल्य यांचे अप्रतिम दर्शन स्पर्धकांनी घडवून आणले. उपस्थित प्रेक्षकांनी खेळाडूंचे कौतुक करत त्यांना भरभरून दाद दिली.
कार्यक्रमादरम्यान किरण रामकृष्ण पाटील यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अशा सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांद्वारे तरुण पिढीला आपल्या परंपरेची ओळख करून देणे हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. १५००० हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात आले
मराठी भाषा दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेली ही मल्लखांब स्पर्धा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Post navigation

Previous: Previous Post
Next: ठाण्यातील प्रख्यात नुरी बाबा दर्ग्यात अवैध वृक्षतोड

Related Stories

  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

लोकाधार April 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

लोकाधार April 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले..

लोकाधार April 3, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

लोकाधार April 16, 2026
  • Blog

प्रेस नोट

लोकाधार April 10, 2026
  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

लोकाधार April 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

लोकाधार April 7, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×