Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • मनोरंजन
  • राजकीय

October 17, 2026
2
  • Blog

October 9, 2026
टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा 3
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

October 8, 2026
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण 1003986974-1024x683.jpg 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ 1003963582 5
  • Blog
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ

August 23, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026

ठाणे :
ठाण्याच्या शिवाई नगर, उन्नती गार्डन मैदान येथे कोकण ग्रामविकास मंडळाच्यावतीने नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य मालवणी महोत्सवात खवय्यांची चंगळ आहे. महोत्सवात विविध पारंपरिक, खाद्य आणि हस्तकला स्टॉल्सनी परिसर गजबजून गेला असून दररोज खवय्यांची झुंबड उडालेली दिसत आहे.
या मालवणी महोत्सवात अहिल्यानगर येथील पांढरी पुल परिसरातील सुप्रसिद्ध ‘आनंदवन भेळ’ या खाद्य पदार्थांच्या स्टॉलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्टॉलवर ग्राहकांच्या फर्माईशीनुसार झटपट ताजी, चटपटीत भेळ तयार करून दिली जाते. भेळची कुरकुरीत चव अनुभवण्यासाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडालेली असते.
आनंदवन भेळचे संचालक आदिनाथ काळे यांनी याविषयी बोलताना, भेळ बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया उलगडून सांगितली. नाशिकच्या कुरमुऱ्या समवेत कुरकुरीत तिखट शेव, बारीक चिरलेला कांदा, ताजे लिंबूरस, सुगंधी कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि भाजलेले शेंगदाणे यांचा योग्य समतोल साधत भेळ तयार केली जाते. चवीचा प्रत्येक घास हा तोंडात पाणी आणणारा ठरत आहे.
स्टॉलवर ओली भेळ, सुकी भेळ आणि मटकी भेळ असे तीन प्रकार उपलब्ध असून प्रत्येक प्रकाराला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः मटकी भेळीची चव रसिकांच्या पसंतीस उतरत आहे.
“भेळ एकदा चाखली की पुन्हा पुन्हा याल,” असे आवाहन करत आनंदवन भेळचे आदिनाथ काळे आणि त्यांचे सहकारी खवय्यांना मालवणी महोत्सवाला अवश्य भेट देण्याचे आवाहन करतात.

Post navigation

Previous: एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण
Next: Next Post

Related Stories

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • Blog

लोकाधार October 9, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×