Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • मनोरंजन
  • राजकीय

October 17, 2026
2
  • Blog

October 9, 2026
टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा 3
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

October 8, 2026
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण 1003986974-1024x683.jpg 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ 1003963582 5
  • Blog
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ

August 23, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • राजकीय
  • ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग; प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग; प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

लोकाधार April 26, 2026

ठाणे, दि.२५ (जिमाका): भारतीय जनगणनेच्या ऐतिहासिक प्रक्रियेला आता ठाणे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, जिल्हा प्रशासनाने या राष्ट्रीय मोहिमेसाठी कंबर कसली आहे. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरयादी आणि घरगणना कामासाठी आजपासून जिल्ह्यातील नऊ चार्ज अधिकारी कार्यालयांमध्ये प्रगणक व पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
या सलग सत्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या संपूर्ण डिजिटल कार्यपद्धतीचे सखोल मार्गदर्शन केले जात असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया कशी पार पाडायची, याचे धडे दिले जात आहेत.
यावेळच्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे पूर्णपणे ‘डिजिटल’ असणे.प्रशिक्षणादरम्यान प्रगणकांना विशेष मोबाईल ॲपचा वापर, क्लिष्ट वाटणाऱ्या प्रश्नावलीचे सुलभीकरण, हाउस लिस्टिंग ब्लॉकची (HLB) अचूक रचना आणि संकलित केलेल्या माहितीची गोपनीयता व सुरक्षितता यांसारख्या तांत्रिक बाबींवर विशेष भर दिला जात आहे. प्रशिक्षणाचे हे टप्पे केवळ सैद्धांतिक नसून, त्यामध्ये प्रात्यक्षिकांचाही समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून प्रत्यक्ष कामाच्या वेळी कोणतीही त्रुटी राहू नये. ही सर्व जय्यत तयारी आगामी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष घरयादी आणि घरगणना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्यवस्थित करण्यासाठी केली जात आहे.
ठाणे जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करताना नागरिकांना आवाहन केले आहे की, जनगणना ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या भविष्यातील नियोजनाचा पाया असल्याने, नागरिकांनी आपल्या दारी येणाऱ्या प्रगणकांना वस्तुनिष्ठ आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावे तसेच, नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या ‘Self Enumeration’ (स्व-गणनेच्या) सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

Post navigation

Previous: Previous Post
Next: Next Post

Related Stories

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • Blog

लोकाधार October 9, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×