Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • राजकीय

July 26, 2026
2
  • राजकीय

July 26, 2026
पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन 3
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

July 23, 2026
4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

July 16, 2026
5
  • मनोरंजन
  • राजकीय

July 16, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय
लोकाधार April 27, 2026

‘सर्वांसाठी घरे’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाधारित नियंत्रणाची गरज – आमदार ॲड. निरंजन डावखरे

मा. उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत नियमबद्धीकरणाच्या जिल्हास्तरीय आढावा समितीची महत्त्वपूर्ण बैठक ठाणे येथे पार पडली. या बैठकीत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत तसेच शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांविषयी महत्त्वपूर्ण मांडणी केली.

बैठकीदरम्यान आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेचे स्वागत करत, उपनगरांतील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या निवाऱ्याच्या प्रश्नाला या निर्णयामुळे दिलासा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. अनेक कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देणारा हा निर्णय लोकाभिमुख असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना भविष्यात अनाधिकृत बांधकामे वाढू नयेत, याबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. शासनाच्या या सकारात्मक निर्णयाचा गैरफायदा घेत काही ठिकाणी नवीन अनधिकृत बांधकामे उभी राहू नयेत आणि अशा प्रकारांना कुठलेही प्रशासकीय किंवा राजकीय संरक्षण मिळू नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. याच अनुषंगाने आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मुंबईच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही गुगल मॅपिंगसारखी तंत्रज्ञानाधारित प्रणाली राबविण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला. सध्याच्या २०२६ सालातील परिस्थितीनुसार जिल्ह्यातील सर्व बांधकामांची अचूक डिजिटल नोंद तयार करून ‘डेटा फ्रीज’ करण्याची संकल्पना राबविली, तर भविष्यातील अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून प्रशासनाकडे अचूक आणि अद्ययावत माहिती उपलब्ध राहून नियमन प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ही प्रणाली जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकसमान पद्धतीने राबविण्याची गरज त्यांनी मांडली.या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ‘मिशन भरारी’ या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या ५९ गुणवंत विद्यार्थ्यांचे आ. डावखरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांची ही निवड ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून त्यांच्या यशातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या विश्वाशी जोडणारा ‘मिशन भरारी’ हा ठाणे जिल्हा परिषदेचा अत्यंत स्तुत्य आणि भविष्यवेधी उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता ५ वी ते ८ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सारख्या नामांकित संस्थांना भेट देण्याची, अंतराळ मोहिमांची माहिती जाणून घेण्याची तसेच वैज्ञानिक प्रयोगांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळते. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख मिळून देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत योगदान देण्याची प्रेरणा निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. तसेच हा उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

एकूणच, ‘सर्वांसाठी घरे’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे या दोन्ही बाबींवर आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मांडलेले विचार ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

या बैठकीस मुरबाडचे आमदार किसन कथोरे, आमदार ॲड. निरंजन डावखरे, कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार राजेश मोरे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार शांताराम मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी . रणजित यादव, शिक्षणाधिकारी. बाळकृष्ण राक्षे, अतिरिक्त जिल्हाधिकारी . हरिश्चंद्र पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी . रामेश्वर पाचे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होत

Post navigation

Previous: ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग; प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू
Next: इतिहासाला धर्माच्या अरुंद चौकटीत बंदिस्त करण्याच्या प्रवृत्तीला प्रत्युत्तर देत, ‘शिवाजी कोण होता ?’ पुस्तकावर ठाण्यात ‘अभिवाचन’

Related Stories

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

लोकाधार July 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×