पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महेश्वरी घाट गणेश मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये बाप्पा झाले विराजमान
ठाणे,:
वंदे मातरम् संघातर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया माघी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ येणार आहेत. अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक तथा भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी दिली. माघी गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला वाजत गाजत श्री गणेशाची विलोभनीय मुर्ती यंदा मध्यप्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला (महेश्वरी घाट) येथील प्राचीन गणेश मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये बाप्पा विराजमान झाले. त्यानंतर आयोजक संदीप लेले यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधुन यंदा ठाण्यातील पाचपाखाडी येथील परमार्थ निकेतन चौकात अहिल्यादेवींच्या (महेश्वरी घाट) किल्यातील प्राचीन गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे. यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष असुन उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, भजन, मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत. अशी माहिती देऊन संदीप लेले यांनी, मुंबई, ठाणे तसेच, अन्यत्र भाजप महायुतीचा महापौर होऊ दे, असे साकडे घातले आहेत. असे सांगितले. महापालिकेत लाभाची पदे मिळाली नाही तर विरोधात बसणार का ? या प्रश्नावर बोलताना त्यांनी, लाभाची पदे वगैरे आमच्यासाठी गौण आहेत मात्र, जनतेचा लाभ झाला पाहीजे, यासाठी संपूर्ण कारभारावर भाजपचा अंकुश असेल. असे स्पष्ट केले. तसेच, वंदे मातरम संघाच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया माघी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला दरवर्षी प्रमाणे यंदाही देवाभाऊ येतील. असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक आदी सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार गणेशोत्सवाला भेट देणार असल्याचे संदीप लेले यांनी सांगितले