Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

ठ 1
  • राजकीय

ठ

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 1003963582 2
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

August 23, 2026
ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर 3
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

August 23, 2026
निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण   4
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

August 16, 2026
ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट  5
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट 

August 11, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ताज्या बातम्या
लोकाधार January 22, 2026

मराठी भाषा अभिजात झाल्याने बोलींना मान्यता – ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे

ठाणे : – आपल्या मातृभाषेत एक ममत्व असते. त्यामुळे आपली भाषा बोलणारा माणूस भेटला की, आपण त्याच्याशी सहजपणाने जोडले जातो. आपली मराठी भाषा ही अशीच ममत्वाची भाषा असून ती विविध बोलींनी समृद्ध केलेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय.. तर या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात बोलल्या जाणाऱ्या सगळ्या बोलींना मान्यता मिळाली, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी येथे केले.

मराठी भाषा पंधरवडानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्यावतीने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांचे ‘जगणे व्हावे गाणे’ या विषयावर गाणी व संवाद या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (22 जानेवारी) केले होते. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह ठाणे महापालिकेच्या विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कवी अरूण म्हात्रे यांचा सन्मान उपायुक्त उमेश बिरारी यांनी केला.मराठीला यावर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल ते म्हणाले, “दोन हजार वर्षांहून अधिक काळ जिवंत असलेली ही भाषा आपल्या आई-वडिलांची, पूर्वजांची आणि पुढील पिढ्यांची ओळख आहे. हा सन्मान म्हणजे मराठी संस्कृतीच्या दीर्घ परंपरेला मिळालेली पावती आहे.” “परदेशात एखादा मराठी माणूस बोलताना ऐकला, की क्षणात परकेपणा नाहीसा होतो. मराठी भाषेची ही आपुलकी शब्दांत मावणारी नाही,” असे ते म्हणाले.भाषा ही केवळ संवादाची साधन नसून ती माणसाची ओळख, आठवणींचा ठेवा आणि भावनांचे घर असते. आपल्या भाषेतील एक शब्दही माणसाला आपल्या मुळांशी जोडून ठेवतो. यावेळी त्यांनी मराठीच्या विविध बोलीभाषांचा उल्लेख केला. “मालवणी, अहिराणी, वऱ्हाडी, कोकणी अशा अनेक बोलीभाषा म्हणजे मराठीच्या समृद्धीचे रंग आहेत. शब्द वेगळे असले तरी भावना एकच आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. अनेकांना आपल्या बोलीभाषेत बोलताना लाज वाटते, परंतु भाषेबद्दल लाज वाटणे योग्य नसून ती आपली ताकद आहे. “कविता जशी शब्दांतून जीवन रंगवते, तशीच भाषाही माणसाच्या जगण्याला अर्थ देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कवी आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टीचे वर्णन आपल्या कवितांमध्ये करत असतो. कोकणातील पावसाचे सौंदर्य, मातीचा सुगंध, समुद्राची किनार असे चित्रण कवी मंगेश पाडगांवकर त्यांच्या ‘वेंगुल्याचो पाऊस’ या कवितेत केले असल्याचे सांगत त्यांनी कविता सादर केली.यावेळी त्यांनी अनेक कवींच्या कवितांवर भाष्य केले. नारायण सुर्वे यांच्या कविता म्हणजे उपेक्षितांचे बोलके दु:ख आणि कष्टकरी माणसांच्या जगण्याचा आरसा असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक कविता या मुखोद्गत असल्याचे सांगत त्यांनी त्यांची ‘उंच माझा झोका’ ही कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

मराठी भाषा पंधरवडा हा आज महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी साजरा होतो आहे. आपली मराठी भाषा ही समृद्ध आहे, हा समृद्ध भाषेचा वारसा आपल्या पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी आपल्या घरात मराठी पुस्तके असणे गरजेचे आहे. आज जर कोणी मला विचारले की तुम्ही श्रीमंत आहात का? तर मी अभिमानाने सांगेन की मराठी पुस्तकांची श्रीमंती माझ्याकडे आहे, भाषेने आपण समृद्ध होत असतो त्यामुळे या मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त पाच मराठी पुस्तके विकत घ्या असा सल्लाही त्यांनी यावेळी दिली. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्यावतीने मंगळवार 27 जानेवारी रोजी सायं. 4.00 वा. कवीसंमेलनाचे आयोजन केलेआहे. तर मराठी भाषा पंधरवडा समारोपादिवशी 28 जानेवारी रोजी महापालिका भवन येथून ग्रंथदिडींचे काढण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Post navigation

Previous: मानव केंद्रीभूत विकास हवा !- पदमश्री चैत्राम पवार
Next: ठाण्यात देवाच्या भेटीला देवाभाऊ येणार…

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट 

लोकाधार August 11, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १४८ ठाणे विधानसभा अध्यक्षपदी ॲड. झिया सय्यद यांची नियुक्ती

लोकाधार August 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

ठ

लोकाधार August 27, 2026
1003963582
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×