Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • मनोरंजन
  • राजकीय

October 17, 2026
2
  • Blog

October 9, 2026
टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा 3
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

October 8, 2026
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण 1003986974-1024x683.jpg 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ 1003963582 5
  • Blog
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ

August 23, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • राजकीय
  • राजकीय
लोकाधार July 26, 2026

इंदिरानगर येथील संप व पंप हाऊसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे (२६) : ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक १५ मधील इंदिरानगर, येथील नागरिकांना पाण्याचा पुरेसा व नियमित पुरवठा करण्यासाठी इंदिरानगर व रूपादेवी पाडा येथे उभारण्यात आलेल्या नवीन संप व पंप हाऊसचे लोकार्पण आज (२६ जुलै २०२६) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे शिवसेना गटनेते पवन कदम, स्थानिक नगरसेविका यज्ञा भोईर, सुरेश कांबळे, अनिता यादव, अमित सरैया, एकता भोईर, योगेश जानकर, प्रशांत जाधवर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी परिवहन सभापती दशरथ यादव, उपनगर अभियंता विनोद पवार, विकास ढोले, कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या प्रकल्पामुळे इंदिरानगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, नियमित आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या दीर्घकालीन पाणी समस्या सुटण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

इंदिरानगर येथील संप येथून ३१ एमएलडी आणि रूपादेवी पाडा येथील संप येथून २१ एमएलडी अशा एकूण ५२ एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा योजनांचे लोकार्पण करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

या भागातील नागरिकांना दररोज पाणी मिळावे, ही अनेक वर्षांची मागणी होती. या योजनेमुळे महिलांची, विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध व्हावी यासाठी २०१८ मध्ये एमआयडीसीकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर संबंधित जागा महापालिकेच्या ताब्यात आल्याने ही योजना प्रत्यक्षात साकारता आली.

या प्रकल्पाचा लाभ इंदिरानगर, रूपादेवी पाडा, साठेनगर, हनुमान नगर, वाल्मिकी पाडा, श्रीनगर, किसन नगर, भटवाडी, शांतिनगर, वारली पाडा, रामनगर, किती तलाव, जुना गाव, कैलासनगर तसेच परिसरातील हजारो नागरिकांना होणार आहे.
नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पुढेही कटिबद्ध राहणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

Post navigation

Previous: पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन
Next: Next Post

Related Stories

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • Blog

लोकाधार October 9, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×