Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार.. 1
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

June 13, 2026
गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल ! 2
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

June 13, 2026
3
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

June 4, 2026
जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा! 4
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

June 2, 2026
महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित 5
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित

June 2, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 19 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘आशा’
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

19 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘आशा’

लोकाधार November 21, 2025

”बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये” अशा प्रभावी टॅगलाईनसह येणाऱ्या ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १९ डिसेंबरला ‘आशा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपली ताकद सिद्ध केली आहे. ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत ‘आशा’ने समीक्षकांची दाद मिळवली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका साकारत आहे रिंकू राजगुरू. या व्यक्तिरिक्त या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

रिंकूने साकारलेली ‘आशा’ ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज आहे. तिच्या डोळ्यांतून दिसणारा संघर्ष, तिच्या पावलांतून जाणवणारी जबाबदारी आणि संकटांचा सामना करताना न हरता उभी राहणारी ताकद आहे. या सर्वांमुळे ही भूमिका चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात, ” ‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाहीये तर घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आहे. सतत नवनवीन विषयांना उचलून धरणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही वेगळ्या वाटेवरची वेगळी आणि अनोखी गोष्ट निश्चितच आवडेल, अशी खात्री आहे.’’

दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर चटवानी आणि रवींद्र अवटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट नाविन्यपूर्ण कथा घेऊन येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना कधीही न पाहिलेल्या दुनियेचं दर्शन घडवणारं आहे.

Post navigation

Previous: ठाणे महापालिका क्षेत्रात कुष्ठरोग शोध विशेष अभियान
Next: ग्लोब ट्रॉटर इव्हेंटमध्ये ‘वाराणसी’ या टायटलची घोषणा, महेश बाबू स्टारर फिल्म संक्रांती 2027 ला रिलीज!

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार June 4, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार June 4, 2026
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

लोकाधार June 2, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×