Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार.. 1
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

June 13, 2026
गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल ! 2
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

June 13, 2026
3
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

June 4, 2026
जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा! 4
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

June 2, 2026
महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित 5
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित

June 2, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • लखनौमध्ये अडकलेल्या 16 ठाणेकर विद्यार्थ्यांची डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली परतण्याची व्यवस्था
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लखनौमध्ये अडकलेल्या 16 ठाणेकर विद्यार्थ्यांची डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली परतण्याची व्यवस्था

लोकाधार December 1, 2025

सोमवारी सकाळच्या विमानाने मुंबईत येणार

ठाणे –

स्काऊट-गाईडच्या शिबिरासाठी लखनौमध्ये गेलेल्या आणि रेल्वे चुकल्यामुळे शुक्रवारपासून तिथेच अडकलेल्या 16 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांची परतण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली. सोमवारी (दि. 1) हे विद्यार्थी सकाळी नऊच्या विमानाने लखनौहून मुंबईत परतणार आहेत.

ठाण्यातील बेडेकर शाळेत सातवी ते नववीच्या वर्गात शिकणाऱ्या 16 विद्यार्थ्यांचा कॅम्प उत्तर प्रदेश येथील लखनौमध्ये गेला होता. शुक्रवारी त्यांची परतण्याची गाडी होती. मात्र, स्टेशनला उशिरा पोहोचल्याने त्यांची गाडी निघून गेली. त्यामुळे त्यांना स्टेशन परिसरातच रात्र काढावी लागली. शुक्रवारी सोबत असणाऱ्या शिक्षकांनी एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीकडून बस आरक्षित केली. बस मालकाने 35 हजार रूपये घेतले. अन् चारबाग परिसरात वाहनात बिघाड झाल्याचे सांगून पोबारा केला. त्यानंतर हे सर्वजण एका धर्मशाळेत आश्रयाला गेले. या मुलांच्या पालकांपैकी एकाने ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांना रात्री एक वाजता फोन करून सांगितली. प्रधान यांनी ही बाब लगेचच डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना कळविली. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी रात्रीच सूत्र हलविली. सर्वात आधी विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था केली. तसेच, तेथील काही लोकप्रतिनिधींशी चर्चा करून उद्या सकाळी 9 वाजेच्या विमानाची तिकिटे आरक्षित केली. हे सर्व विद्यार्थी सोमवारी साडेबारा वाजेपर्यंत मुंबईत येणार आहेत.

Post navigation

Previous: Previous Post
Next: ठाणे पूर्व कोपरीत मासळी विक्रेत्या आजीची दीड लाखांची रोकड लंपास

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार June 4, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार June 4, 2026
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

लोकाधार June 2, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×