Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

February 28, 2026
2
  • राजकीय

February 27, 2026
कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

February 17, 2026
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

February 17, 2026
5
  • ताज्या बातम्या

February 17, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • राजकीय
  • ठाण्यात मतदार यादी मध्ये साडेचार लाख बोगस मतदारांचा सहभाग
  • राजकीय

ठाण्यात मतदार यादी मध्ये साडेचार लाख बोगस मतदारांचा सहभाग

लोकाधार November 22, 2025
IMG_20251122_134426.jpg

आज शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे खालील प्रमाणे ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 की 2026 हे अद्याप तरी अधांतरी आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी निवडणूक प्रक्रिया मात्र चालू झालेली आहे. 20 नोव्हेंबर पासून मतदार याद्या वाटप सुरू करण्यात आलेला आहे आणि या याद्यांवर काम करून हरकती आणि सूचना देण्यासाठी 27 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
          ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयामध्ये विविध पक्षाचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवार याद्या घेण्यासाठी जात आहेत. त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये अजून तरी छापील याद्या उपलब्ध नाहीत ते नाव नोंदवून त्यांना एक दोन दिवसाची मुदत देत आहेत जर याद्यांचं वाटपच झालेलं नसेल तर इतकी तोकडी मुदत ही हरकत आणि सूचना घेण्यासाठी पुरेशी आहे का?मंजूर नकाशा आणि त्यामधील मतदार संख्या मतदार यादी मधील संख्या यामध्ये काही हजारांची तफावत आहे ही देखील गंभीर बाब यामध्ये दिसून आलेली आहे हे एका प्रभागाचं निरीक्षण आहे असे ठाणे महानगरपालिकेत 33 प्रभाग आहेत नकाशामध्ये दाखवलेल्या सीमारेषेच्या बाहेरील देखील इमारती आणि मतदारांची नोंदणी मतदार यादीत करण्यात आलेली आहे. एकूण मतदार संख्या अंदाजे 16 लाख 49 हजार एवढी आहे आणि त्यामध्ये साधारण चार लाखाच्या आसपास वाढीव मतदान आहे. याचा अर्थ सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रभागांमध्ये वीस पंचवीस हजार किंवा 25 टक्के मतदार संख्या वाढली आहे.
या सगळ्याचा विचार करता निवडणूक आयोग पूर्णपणे पक्षपाती भूमिका घेत असल्याचे दिसून येते आणि सर्व प्रशासन त्यांना अनुकूल अशी भूमिका घेत आहे आणि या गोष्टीलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्षेप घेत आहे.सोमवारी महानगर पालिका मुख्यालयामध्ये याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी जाणार आहेत आणि या गोंधळाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारणार आहेत.

Post navigation

Previous: दिव्यांग बांधवांच्या पेंशनचा मार्ग होणार सुकर
Next: ठाण्याच्या क्रिकेटच्या ‘विकासा’साठी एमसीए सर्वोतोपरी सहाय्य करणार  – एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक  

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×