Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार.. 1
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

June 13, 2026
गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल ! 2
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

June 13, 2026
3
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

June 4, 2026
जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा! 4
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

June 2, 2026
महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित 5
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित

June 2, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ठाण्यात स्पॅरोताई फाऊंडेशनतर्फे ‘चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा’ उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

ठाण्यात स्पॅरोताई फाऊंडेशनतर्फे ‘चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा’ उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकाधार March 20, 2026

ठाणे, : चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा अशी जनजागृती करण्यासाठी कार्यरत असलेल्या स्पॅरोताई फाऊंडेशन या संस्थेतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. या संस्थेचे संस्थापक डॉ. राज परब आणि डॉ. ज्योती परब हे दाम्पत्य गेली पंधरा वर्षे चिमण्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सातत्याने कार्य करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ही संस्था कार्यरत आहे.

२० मार्च, जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून ‘चिमणी जगायला हवी’ या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही स्पॅरोताई फाऊंडेशनच्या वतीने संकल्प इंग्लिश स्कूल, ठाणे येथे चिमणी संवर्धन उपक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले.काही वर्षांमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे उज्वल भविष्य घडवू शकतात हे लक्षात घेऊन स्पॅरोताई फाऊंडेशन या संस्थेने ठाण्यातील ५० शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांमध्ये चिमण्यांविषयी जाण व आपुलकी निर्माण व्हावी व त्यांनी चिमण्यांचे संवर्धन कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.वीद्यार्थ्यांनी चिमण्यांवर आधारित सुंदर चित्रे काढली व चिमण्यांच्या संवर्धनाबाबत आपली मते मांडली तसेच शिक्षकांनी चिऊताईसाठी टाकाऊ पासून टिकाऊ असे सुंदर फिडर बनवले. स्पॅरो ताई फाऊंडेशनच्या सदस्या कु. साक्षी परब यांनी विद्यार्थ्यांना चिमण्यांबाबत प्रश्न विचारले व योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यास आकर्षक ‘स्पॅरो वॉल हॅंगिंग’ देऊन कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये “चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा” तसेच “Love Sparrow, Save Sparrow” असा संदेश देणाऱ्या गांधी टोपी परिधान करून तसेच “या चिमण्यांनो परत फिरा रे!”, “हम सब ने यह ठाना है, गौरैया को बचाना है|” असे संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी चिमण्यांविषयी जनजागृती केली यावेळी विद्यार्थ्यांसाठी चिमणीच्या चित्रासोबत बनविलेला सेल्फी पॉईंटही मुख्य आकर्षण ठरलाया कार्यक्रमाअंती मान्यवरांच्या हस्ते विविध शाळांमधील उपस्थित शिक्षकांना व विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र, तसेच पक्ष्यांना दाणा, पाणी, निवारा उपलब्ध होण्यासाठी मातीचे भांडे, फीडर व घरटे देण्यात आले.
या वेळी स्पॅरोताई फाऊंडेशन महाराष्ट्र चे संस्थापक डॉ. राज परब व डॉ. ज्योती परब यांनी सांगितले की, “बालपणी आपण घराच्या आसपास चिमण्या पाहायचो, त्यांच्या किलबिलाटाने वातावरण आनंदी व्हायचे. मात्र आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. या लहानशा पक्ष्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराजवळ पाणी, दाण्याची व त्यांच्या निवाऱ्याची सोय करावी,” असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमात समाजसेवक श्री. माणिक पाटील, कोकणविभाग शिक्षक शिक्षकेतर सचिव श्री. गोकुळ पाटील, श्री इंग्लिश स्कूलचे संस्थापक श्री. रघुनाथ अडसूळ, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हासंपर्क प्रमुख श्री. प्रकाश माळी, ठाणे शहर सचिव श्री. निशिकांत महांकाळ तसेच राज्यसंपर्क प्रमुख श्री. राजेंद्र गोसावी हे मान्यवर उपस्थित होते. स्पॅरोताई फाऊंडेशनच्या संपर्क प्रमुख सौ. प्रणाली गिरी यांनी सर्व शाळांशी संपर्क करून विदयार्थी व शिक्षक यांना एकत्रित आणण्याची अवघड धुरा सांभाळली.

अशा प्रकारे संकल्प इंग्लिश स्कूल, ठाणे येथे चिमणी संवर्धनाचा कार्यक्रम आनंदात व उत्साहात पार पडला.

Post navigation

Previous: स्ट्रगल संपला ? माने निघाले “मामाच्या गोव्याला” ?
Next: ‘ बिट्टू बॉस ‘ला अखेरचा निरोप..

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार June 4, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार June 4, 2026
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

लोकाधार June 2, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×