Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

आमदार संजय केळकरांकडुन पत्रकारांना डिजिटल भेट 1
  • ताज्या बातम्या

आमदार संजय केळकरांकडुन पत्रकारांना डिजिटल भेट

October 29, 2026
2
  • मनोरंजन
  • राजकीय

October 17, 2026
3
  • Blog

October 9, 2026
टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा 4
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

October 8, 2026
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण 1003986974-1024x683.jpg 5
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

August 27, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आमदार संजय केळकरांकडुन पत्रकारांना डिजिटल भेट
  • ताज्या बातम्या

आमदार संजय केळकरांकडुन पत्रकारांना डिजिटल भेट

लोकाधार October 29, 2026

ठामपा पत्रकार कक्षात दोन अद्ययावत संगणक प्रदान

ठाणे, प्रतिनिधी
ठाणे विधानसभा मतदारसंघातील शाळा आणि शासकीय कार्यालये डिजिटल करण्याच्या उपक्रमासोबतच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेलाही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, या उद्देशाने आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या ठामपा पत्रकार कक्षाला दोन अद्ययावत संगणक भेट दिले. यापूर्वीही पत्रकार संघाच्या मागणीनुसार सहा संगणक उपलब्ध करून दिल्याचे सांगत, पत्रकारांसाठी उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि केशवसृष्टी येथे अभ्यासदौरा आयोजित करणार असल्याची घोषणाही आ. केळकर यांनी केली.
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या पत्रकार कक्षात गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी या संगणकांचे लोकार्पण करण्यात आले. पत्रकारितेच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, माहितीचे संकलन आणि बातम्यांची निर्मिती अधिक सुलभ व्हावी, यासाठी हे संगणक उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील शाळा तसेच विविध शासकीय कार्यालयांना संगणक उपलब्ध करून देत आ. केळकर यांनी मतदार संघाचे डिजिटल सक्षमीकरण केले आहे. याच धर्तीवर पत्रकारितेच्या क्षेत्रालाही अद्ययावत सुविधांची जोड मिळावी, या भूमिकेतून ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षासाठी संगणक उपलब्ध करून दिल्याचे आ. संजय केळकर यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांना केवळ तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यापुरतेच मर्यादित न राहता, त्यांना अभ्यास आणि माहितीच्या माध्यमातून अधिक समृद्ध करण्यासाठी उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तसेच केशवसृष्टी येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही आ. केळकर यांनी स्पष्ट केले. केशवसृष्टी मध्ये पत्रकारांना प्रशिक्षण देण्याबाबत संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी आपल्या भाषणात सूचना केली होती.
या लोकार्पण सोहळ्याला भाजपचे नगरसेवक सुरेश कांबळे, कृष्णा भुजबळ, विशाल वाघ आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, कार्याध्यक्ष दीपक शेलार, उपाध्यक्ष निलेश मंडलिक, सरचिटणीस राजीव डाके, खजिनदार राजेश शेटकर, सदस्य अमर राजभर, गजानन हरिमकर, सारिका साळुंखे आदीसह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post navigation

Previous: Previous Post

Related Stories

1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026
1003963582
  • Blog
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ

लोकाधार August 23, 2026
1003925089
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या

आमदार संजय केळकरांकडुन पत्रकारांना डिजिटल भेट

लोकाधार October 29, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • Blog

लोकाधार October 9, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×