Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

February 28, 2026
2
  • राजकीय

February 27, 2026
कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

February 17, 2026
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

February 17, 2026
5
  • ताज्या बातम्या

February 17, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ताज्या बातम्या
लोकाधार January 27, 2026

ठाणे महापालिकेच्यावतीने 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

· सफाई कर्मचारी ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित

       ठाणे  :  भारतीय प्रजासत्ताकाचा 77 वा वर्धापन दिन ठाणे महानगरपलिकेच्यावतीने सोमवारी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी मानवंदना दिली. राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

      ध्वजवंदनानंतर, ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त सौरभ राव यांनी सन्मान केला. मुख्य स्वच्छता  निरीक्षक शयुराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता  निरीक्षक, लक्ष्मण पुरी, स्वच्छता  निरीक्षक समीर डोळे सफाई कर्मचारी मंगल पवार, सुंदरी डोवर, बाबा होनमाने, श्रीकांत देवळेकर, हरिश्चंद्र भोसले, तृप्ती पाटील, शोभा म्हात्रे, आरती ठोके, चंद्रकांत जेधे,  निलेश भानुशाली, सतीश सिध्दरेड्डी या विविध प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.  ध्वजवंदन सोहळ्यास, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे सर्व उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी, नवनिर्वाचित नगरसेवक नारायण पवार,  विमल भोईर,कल्पना पाटील तसेच नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. प्रांगणातील सोहळ्यानंतर, महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याबरोबरच, महापालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आणि कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे उपस्थित होते.

बीज मोदक रांगोळीचे आयुक्तांकडून कौतुक ठाणे महापालिका मुख्यालयात माझी वसुंधरा अभियानातंर्गत बीज मोदक तिरंगा ही रांगोळी साकारण्यात आली होती. या रांगोळीचे वैशिष्टय म्हणजे हे बीज मोदक माती, शेण यांचा वापर करुन बनविण्यात आले होते. या मोदकांमध्ये विविध वनस्पतींच्या बियांचा समावेश होता. या सहा हजार मोदकाचे वाटप ‍ विविध प्रभागातील नागरिकांना करण्यात येणार असून त्या अंतर्गत असलेल्या बियांची लागवड केली जाणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी ठाणे ही एकमेव महानगरपालिका असून ही बीज मोदक रांगोळी प्रभात चॅरिटेबल ट्रस्टने साकारली होती. या उपक्रमाचे आयुक्त सौरभ राव यांन यांनी कोवतुक केले.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; motionR: 0; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 261.91074;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 38;

Post navigation

Previous: ठाण्यात देवाच्या भेटीला देवाभाऊ येणार…
Next: Next Post

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×