Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार.. 1
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

June 13, 2026
गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल ! 2
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

June 13, 2026
3
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

June 4, 2026
जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा! 4
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

June 2, 2026
महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित 5
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित

June 2, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सुप्रसिद्ध दंत शल्यचिकित्सक डॉ. उल्हास वाघ यांना ” जीवन गौरव पुरस्कार” प्रदान
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

सुप्रसिद्ध दंत शल्यचिकित्सक डॉ. उल्हास वाघ यांना ” जीवन गौरव पुरस्कार” प्रदान

लोकाधार November 27, 2025

ठाणेः दंत शल्यचिकित्सा क्षेत्रातील नामांकित डॉ उल्हास वाघ यांना नुकतेच दि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी नेरुळ, नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील विद्यापीठ परिसरात झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय पातळीवरील विशेषतज्ञ परिषदेत इंडियन अँकेडमी ऑफ ओरल मेडिसिन अँन्ड रेडिओलॉजी या संस्थेद्वारा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. उल्हास वाघ गेली ४५ वर्षे अव्याहतपणे रुग्णसेवा देत आहेत. भिवंडी येथील लैंगिक व्यावसायिक महिलांसाठी त्यांनी ‘साथी प्रकल्प ‘यशस्वीपणे दहा वर्षे राबविला. ज्या योगे त्या उपेक्षित महिलांमधील गुप्तरोग तसेच एच आय.व्ही/एड्सचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करून त्यांना निरोगी जीवन प्रदान करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कामाची दखल युएनएफपीए, युएसफ, युनिसेफ, तसेच जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून त्यांचे कार्य सदर महिलांचे सबलीकरण व त्यांच्या मुलांच्या
शिक्षणासंद‌र्भात अजूनही चालू आहे. आपल्या देशात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुख कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे गेली 36 वर्षे डॉ. वाघ तंबाखू विरोधी मोहिम यशस्वीरित्या राबवीत आहेत.
आपल्या वाहनामध्ये फिरते डेंटल क्लिनिक आपल्या सह‌काऱ्यांसह घेऊन आदिवासी पाडे, वृद्धाश्रम, मतीमंद मुले, तसेच तळागळातील गरजू लोकांसाठी दंत वैदयकीय सेवा पुरवित आहेत. कोव्हीड काळात सुद्धा एकही दिवस विश्रांती न घेता गरजू रुग्णांना अथकरित्या सेवा दिली आहे. डॉ उल्हास वाघ यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘जीवन गौरव पुरस्कार ‘देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Post navigation

Previous: Previous Post
Next: “ज्यांनी लावली कराडची वाट,त्यांना नारळ देऊन दाखवा घरची वाट!”

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार June 4, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • राजकीय

अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामे अधिवेशनात गाजणार..

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

लोकाधार June 13, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार June 4, 2026
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

लोकाधार June 2, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×