Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

February 28, 2026
2
  • राजकीय

February 27, 2026
कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

February 17, 2026
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

February 17, 2026
5
  • ताज्या बातम्या

February 17, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • Blog
  • एड संदीप लेले ठाणे भाजपा साठी लकी अध्यक्ष
  • Blog

एड संदीप लेले ठाणे भाजपा साठी लकी अध्यक्ष

लोकाधार January 19, 2026

ठाणे :

राज्यातील इतर शहरांप्रमाणेच ठाणे शहरातही महायुतीचा निर्विवाद विजय झाला आहे. पक्षाची संघटनात्मक धूरा सांभाळणारे जिल्हाध्यक्ष संदिप लेले हे भारतीय जनता पार्टीचे लकी अध्यक्ष ठरले असून, २०१२, २०१७ आणि २०२६ च्या भाजपाच्या विजयात संदिप लेले यांचा सिंहाचा वाटा आहे. २०१२ मध्ये ४ वरून भाजपाने ८ पर्यंत जागा निवडून आल्या.तर २०१७ मध्ये भाजपाने प्रथमच स्वबळावर निडणूक लढवली.त्यात लेले याच्या अथक मेहनतीमुळे एक वेगळाच करिश्मा करुन दाखवित ८ जागांवरून २३ वर आकडा पोहचवला. तर २०२६ मध्ये २८ जागांवर मजल मारलेली आहे. युतीमध्ये लढलेल्या या निवडणुकीत भाजपाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे.
ठाणे शहरामध्ये जनसंघाच्या काळापासून राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वत: ही विचारधारा बाळगणारी शेकडो नागरिक आहेत. भाजपाच्या स्थापनेनंतर प्रतिकूल परिस्थितीतही अनेक कुटुंबांनी निष्ठा, आत्मियता आणि आपुलकीने पक्षाचा प्रचार केला. अत्यंत मर्यादित साधनांच्या बळावर भाजपाच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली, अशा कुटुंबांमध्ये लेले कुटुंबियांचा समावेश आहे. याच कुटुंबातील संदिप लेले हे तरुण अध्यक्ष आज ठाणे शहर जिल्हा भाजपासाठी लकी अध्यक्ष म्हणून ठरले आहेत.
भाजपाने ठाणे शहरात अनेक वर्ष संघर्ष केला. भाजपा व शिवसेनेची राज्यस्तरावर युती असली, तरी अनेक निवडणुकांत भाजपा व शिवसेना समोरासमोर लढली होती. परंतु, पक्षाची ताकद ५ नगरसेवकांपुढे जात नव्हती. अशा परिस्थितीत भाजपाच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने नवी वाट चोखाळून प्रथमच संघाच्या मुशीत तयार झालेला आणि अभाविप मध्ये ताऊनसुलाखुन निघालेल्या श्री.संदिप लेले यांची ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केली.
एक प्रामाणिक, मेहनती आणि जनसामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून संदिप लेले यांची ओळख आहे. ठाणे शहरातील सामान्य नागरिकांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली आहे . जनतेच्या हाकेला धावून जाणारा एक सामान्य कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य आणि धार्मिक उपक्रम राबविले आहे. त्यामुळे नव्या दशकाचा भाजपाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे नागरिकांकडून पाहिले जात आहे.

जिल्हाध्यक्षपद सांभाळत असताना संदिप लेले यांच्या नेतृत्वात भाजपाने २०१२ मध्ये युतीमध्ये निवडणूक लढविली. या निवडणुकीत संदिप लेले यांनी वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्त्यांची साथ घेत भाजपाचे संख्याबळ प्रथमच ४ वरून दुप्पट म्हणजे ८ पर्यंत नेले. त्यावेळी त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची चुणूक दिसली.
राज्यात भाजपाची सत्ता असताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७ च्या निवडणुकीसाठी संदिप लेले यांच्याकडे पुन्हा धुरा दिली. या निवडणुकीतही संदिप यांनी करिष्मा करून दाखविला. स्वबळावर झालेल्या या निवडणुकीत संदिप लेले यांनी भाजपाचे संख्याबळ ८ वरून २४ पर्यंत नेले. भाजपाच्या ठाणे शहराच्या इतिहासात प्रथमच २० हून अधिक नगरसेवक निवडून आले होते.
भाजपाच्या नेतृत्वाने सलग तिसऱ्या महापालिका निवडणुकीसाठी २०२५ मध्ये पुन्हा संदिप लेले यांची अध्यक्षपदी निवड केली. पक्षाचे वरिष्ठ नेते, प्रमुख कार्यकर्ते, युवा मोर्चा आणि महिला मोर्चातील कार्यकर्त्यांच्या समन्वयाने भाजपाने स्वबळाची तयारी केली होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा-शिवसेना-आरपीआय (आठवले) यांची युती झाली. या युतीतून पुन्हा भाजपाचे संख्याबळ हे २३ वरून २८ पर्यंत गेले आहे.

Post navigation

Previous: Previous Post
Next: मानव केंद्रीभूत विकास हवा !- पदमश्री चैत्राम पवार

Related Stories

  • Blog

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची “चार्जिंग!”

लोकाधार January 27, 2026
  • Blog

लोकाधार January 27, 2026
  • Blog

मानव केंद्रीभूत विकास हवा !- पदमश्री चैत्राम पवार

लोकाधार January 20, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×