
शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आता येत्या १२ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत होणार असून त्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी, अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे यांच्या वतीनं केली. ही विनंती मान्य करून येत्या १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.