Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • राजकीय

July 26, 2026
2
  • राजकीय

July 26, 2026
पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन 3
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

July 23, 2026
4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

July 16, 2026
5
  • मनोरंजन
  • राजकीय

July 16, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • राजकीय
  • राजकीय
लोकाधार July 26, 2026

प्रेस नोट

लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात संपन्न

ठाणे, दि. २६ जुलै : लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) यांच्या वतीने राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष मा. नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. श्री. सुनिल तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच Generic Aadhar चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्जुन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर, उद्योजकता, नवकल्पना आणि यशस्वी भविष्यासंदर्भात प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या सोहळ्याला ठाणे शहरासह परिसरातील हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या सोहळ्यात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमादरम्यान लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ८ लॅपटॉप आणि १६ टॅबलेट बक्षीस स्वरूपात वितरित करण्यात आले. तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आली.

-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
ठाणे शहर (जिल्हा)

Post navigation

Previous: Previous Post

Related Stories

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

लोकाधार July 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×