Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

ठ 1
  • राजकीय

ठ

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 1003963582 2
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

August 23, 2026
ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर 3
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

August 23, 2026
निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण   4
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

August 16, 2026
ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट  5
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट 

August 11, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • राजकीय
  • प्रेस नोटउंच टॉवर उभे राहतात, पण पाणी कुठून आणणार?; ठाण्याच्या पाणी प्रश्नावर विधान परिषदेत आमदार ॲड. निरंजन डावखरे लक्षवेधीच्या माध्यमातून वेधले लक्ष
  • राजकीय

प्रेस नोटउंच टॉवर उभे राहतात, पण पाणी कुठून आणणार?; ठाण्याच्या पाणी प्रश्नावर विधान परिषदेत आमदार ॲड. निरंजन डावखरे लक्षवेधीच्या माध्यमातून वेधले लक्ष

लोकाधार June 26, 2026

मुंबई |
ठाणे जिल्ह्यातील वाढती पाणीटंचाई, वेगाने होणारे शहरीकरण आणि भविष्यातील जलसुरक्षेचा गंभीर प्रश्न आज विधानपरिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रभावीपणे उपस्थित केला. बारवी धरणावरील वाढता ताण, पाणीपुरवठ्याचे नियोजन, नव्या बांधकामांना दिल्या जाणाऱ्या परवानग्या आणि भविष्यातील पाणी नियोजनाबाबत शासनाने दीर्घकालीन धोरण जाहीर करावे, अशी ठोस मागणी त्यांनी सभागृहात केली.

सभागृहात बोलताना आमदार डावखरे यांनी सांगितले की, बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि परिसरातील लाखो नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण आणि अपुरा पावसामुळे दरवर्षी नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये नियोजित पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ येत असून या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
मुरबाड तालुक्यासह काही औद्योगिक आणि नागरी वसाहतींना बारवी धरणातून पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याकडे लक्ष वेधत त्यांनी या भागांसाठी शासनाचे स्वतंत्र नियोजन काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य फेरनियोजन, औद्योगिक आणि नागरी वापरामध्ये संतुलन तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन जलधोरण तयार करण्याची मागणी त्यांनी केली.

ठाणे महानगरपालिकेची लोकसंख्या सुमारे १५ लाखांवरून २२ लाखांहून अधिक झाली असून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही झपाट्याने शहरीकरण होत आहे. मात्र अनेक मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना अद्याप अधिकृत पाणी जोडणी उपलब्ध नसून ते केवळ बोअरवेलवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष उपलब्धता तपासल्याशिवाय नव्या मोठ्या बांधकामांना परवानगी देऊ नये, तसेच प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र जलउपलब्धता अहवाल (Water Availability Report) अनिवार्य करण्याचे निर्देश शासनाने सर्व महानगरपालिकांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

बारवी धरणाची साठवण क्षमता वाढविणे, भविष्यातील लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन नवीन जलस्रोत विकसित करणे आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचा वस्तुनिष्ठ आढावा घेणारी ‘जलसुरक्षा श्वेतपत्रिका’ नागपूर अधिवेशनापूर्वी जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. हा प्रश्न केवळ पाणीपुरवठा विभागापुरता मर्यादित नसून नगरविकास, जलसंपदा, एमआयडीसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असल्याने चालू अधिवेशनातच सर्व संबंधित विभागांची संयुक्त व्यापक बैठक आयोजित करण्याचा आग्रह त्यांनी धरला.

या चर्चेला उत्तर देताना पाणीपुरवठा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी बारवी धरण हे एमआयडीसीच्या मालकीचे असून त्यातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड आणि शहापूर परिसराला पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती दिली.

यंदाचे वर्ष ‘अल् निनो’चे असल्यामुळे पावसास विलंब झाला असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्राच्या पाणीपुरवठ्यात आवश्यक ती कपात करून न्याय्य पद्धतीने पाण्याचे फेरनियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आमदार डावखरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेत वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभाग, नगरविकास विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त बैठकीद्वारे व्यापक कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच बारवी धरणाची क्षमता वाढविण्याच्या मागणीची जलसंपदा विभागामार्फत तपासणी केली जाईल. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मुंबई-ठाणे महानगर प्रदेशासाठी ‘शिलार’ आणि ‘पोशीर’ ही दोन नवीन धरणे प्रस्तावित असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.याशिवाय आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत शहरी भागातील प्रत्येक नागरिकाला दररोज १३५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने राज्य शासन दीर्घकालीन उपाययोजनांवर काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या चर्चेनंतर आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणे जिल्ह्याच्या जलसुरक्षेचा प्रश्न केवळ आजचा नसून पुढील अनेक दशकांच्या नियोजनाशी संबंधित असल्याचे नमूद करत, वाढत्या लोकसंख्येला सुरक्षित आणि शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने दीर्घकालीन धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

Post navigation

Previous: फुटीर खासदार संजय दिना पाटीलांविरोधात ठाण्यात संतापाचा उद्रेक
Next: Next Post

Related Stories

  • राजकीय

ठ

लोकाधार August 27, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

ठ

लोकाधार August 27, 2026
1003963582
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×