Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • राजकीय

July 26, 2026
2
  • राजकीय

July 26, 2026
पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन 3
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

July 23, 2026
4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

July 16, 2026
5
  • मनोरंजन
  • राजकीय

July 16, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
लोकाधार June 4, 2026

ठाण्याच्या सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याची सीबीएसई अध्यक्षपदी नियुक्ती

ठाणे (03) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्षपदी 2001 बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रशांत सीताराम लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रशांत लोखंडे हे ठाणे महानगरपालिकेच्या कै. सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असून त्यांच्या या नियुक्ती बद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

   प्रशासकीय सेवेत प्रवेशासाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षण त्यांनी या संस्थेतून घेतले होते. त्यांच्या या यशामुळे संस्थेचे माजी विद्यार्थी, प्रशिक्षक तसेच ठाणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सन 1995 मध्ये त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता.

  ठाण्यातील सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतून घडलेला विद्यार्थी देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक मंडळाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार असल्याने संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. प्रशांत लोखंडे हे एजीएमयूटी (AGMUT) कॅडरचे 2001 बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्या ते केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत होते.सीबीएसईच्या सर्वोच्च पदावर मराठी अधिकारी विराजमान झाल्याने राज्यासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे.


Post navigation

Previous: जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!
Next: गुन्हेगार मोकाट, ठाणेकर भयभीत; तलावपाळी हत्येनंतर काँग्रेसचा हल्लाबोल !

Related Stories

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

लोकाधार July 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×