Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

ठ 1
  • राजकीय

ठ

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 1003963582 2
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

August 23, 2026
ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर 3
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

August 23, 2026
निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण   4
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

August 16, 2026
ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट  5
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट 

August 11, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अहिल्यादेवींच्या आदर्शांवर राज्याचा राज्यकारभार सुरु
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • व्हिडिओ

अहिल्यादेवींच्या आदर्शांवर राज्याचा राज्यकारभार सुरु

लोकाधार June 1, 2026

चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहिल्यादेवींच्या 301 व्या जयंतीनिमित्त विकास, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचा पुनरुच्चार

अहिल्यानगर

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चोंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार करण्याची ग्वाही देत चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची घोषणा केली. अहिल्यादेवींचा न्याय, लोककल्याण, सेवाभाव आणि मानवतेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करताना त्यांनी विकास, महिला सक्षमीकरण, शेतकरी हित आणि सांस्कृतिक पुनर्जागरण या सरकारच्या प्राधान्यक्रमांचा पुनरुच्चार केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रामराव वडपुते, आमदार अमोल खताळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार उत्तमराव जानकर, आमदार विठ्ठलराव लंगे, आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अहिल्यादेवी होळकर या केवळ राज्यकर्त्या नव्हत्या, तर लोकमाता, न्यायप्रिय आणि जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या युगप्रवर्तक होत्या. त्यांच्या कार्याचे स्मरण झाले की न्याय, धर्म, लोककल्याण आणि आदर्श राज्यकारभार डोळ्यांसमोर उभा राहतो, असे सांगत शिंदे यांनी त्यांच्या जीवनकार्याला अभिवादन केले.

चौंडीच्या विकासासाठी राज्य सरकारने सुमारे 1200 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला असून या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. चौंडी
हे केवळ गाव नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि इतिहासाचे पवित्र स्थळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

अहिल्यादेवींच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्याला त्यांचे नाव देण्याची मागणी होताच महायुती सरकारने तातडीने निर्णय घेत जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ असे केल्याची आठवण त्यांनी करून दिली. “पाहू, बघू” अशी भूमिका न घेता त्वरित निर्णय घेणे ही आमची कार्यपद्धती असल्याचे सांगत त्यांनी शासनाच्या निर्णयक्षमतेवर भर दिला.
यावेळी बोलताना शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या उपक्रमांचाही गौरव केला. काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल कॉरिडॉर, अयोध्येतील भव्य राम मंदिर, केदारनाथ पुनर्विकास यांसारख्या प्रकल्पांमुळे भारताचा सांस्कृतिक स्वाभिमान अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवींनी तीनशे वर्षांपूर्वी देशभर मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि लोकोपयोगी कामांच्या माध्यमातून सांस्कृतिक एकात्मतेचे कार्य केले होते. त्याच विचारांचा वारसा आजही पुढे नेला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून त्या विचारांचा विस्तार संपूर्ण देशभर केला, असे सांगत शिंदे यांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केले. धर्म, संस्कृती, न्याय आणि मानवतेचा समन्वय साधणाऱ्या अहिल्यादेवी आजही संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान असल्याचे ते म्हणाले.

अहिल्यादेवींनी तलवारीपेक्षा न्यायावर, सत्तेपेक्षा सेवाभावावर आणि वैभवापेक्षा जनकल्याणावर विश्वास ठेवला. अनेक वैयक्तिक दुःख आणि संकटांना सामोरे जाऊनही त्यांनी समाजकारण आणि लोककल्याणाचा मार्ग सोडला नाही. त्यामुळे तीनशे वर्षांनंतरही संपूर्ण देश त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे शिंदे म्हणाले.

जलसंवर्धन आणि लोककल्याणाच्या क्षेत्रातही अहिल्यादेवींची दूरदृष्टी अधोरेखित करताना शिं
दे म्हणाले की, तीनशे वर्षांपूर्वी त्यांनी विहिरी, तलाव, घाट आणि जलव्यवस्थापनाची कामे केली. आज राज्य सरकार जलयुक्त शिवार, जलसंधारण आणि विविध सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून त्याच विचारांना पुढे नेत आहे. गोदा-नर्मदा जोड प्रकल्प हा केवळ विकासाचा नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि जलसंवर्धनाचा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही देत त्यांनी पिकविमा योजना, शेतकरी सन्मान योजना आणि विविध कृषी कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. शेतकऱ्यांवरील संकटे दूर व्हावीत आणि राज्यात चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, स्त्री ही केवळ घराची शक्ती नसून संपूर्ण राष्ट्राला दिशा देणारी शक्ती आहे. अहिल्यादेवींनी महिलांना स्वावलंबन, नेतृत्व आणि कर्तृत्वाची प्रेरणा दिली. त्याच विचारातून राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली असून, कोणाच्याही विरोधामुळे ही योजना बंद होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चौंडीच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मुंबई-पुणे मार्गावरील शिंग्रोबा मंदिरासंदर्भातील प्रश्नावरही लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देत समाजासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, विकास आणि संस्कृती यांचा समतोल साधणे आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काम करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे सांगत शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

….

Post navigation

Previous: Previous Post
Next: Next Post

Related Stories

  • राजकीय

ठ

लोकाधार August 27, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

ठ

लोकाधार August 27, 2026
1003963582
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×