Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • मनोरंजन
  • राजकीय

October 17, 2026
2
  • Blog

October 9, 2026
टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा 3
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

October 8, 2026
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण 1003986974-1024x683.jpg 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ 1003963582 5
  • Blog
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ

August 23, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय
लोकाधार May 27, 2026

नालेसफाईची कामे युध्दपातळीवर पूर्ण करावीत – आयुक्त सौरभ राव

आयुक्तांनी घेतला प्रभागसमितीनिहाय नालेसफाई कामाचा आढावा

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे पूर्ण करत असताना कामाचा दर्जा, कामाची गती आणि वेळेत कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, नालेसफाईची उर्वरित कामे 5 जूनपर्यत युध्दपातळीवर पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करुन आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामुग्री उपलब्ध करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा प्रभागसमिती निहाय आढावा आयुक्तांनी घेतला. या बैठकीस उपायुक्त मधुकर बोडके, दीपक झिंजाड, डॉ. मिताली संचेती, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सर्व प्रभागसमितीचे सहायक आयुक्त व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
ज्या परिसरात नालेसफाईची कामे सुरू आहेत, किंबहुना ज्या ठिकाणी काम करताना अडचणी निर्माण होत असतील तर त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवावा, त्यांच्याकडून नालेसफाईबाबत ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना सर्व सहायक आयुक्तांना दिल्या.तसेच ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहेत, जेथे दरवर्षी पाणी साचते, अशा ठिकाणी जवळपास 102 पंप बसविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचल्यास त्या ठिकाणी पंप ऑपरेटरची व्यवस्था करणे तसेच पंप बंद पडल्यास तात्काळ कार्यवाही होईल याबाबत नियोजन करावे, शहरातील संवेदनशील आणि पूरप्रवण ठिकाणी विशेष लक्ष ठेवून उपाययोजना राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या.नालेसफाईदरम्यान काढण्यात येणारा गाळ तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच रेल्वे हद्दीलगत असलेल्या कल्व्हर्ट, नाले, खाडीमुख आउटलेट्सची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच ज्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासत असेल त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. नालेसफाईची कामांचा दैनंदिन आढावा घेवून केलेल्या कामाचा तपशील ठेवावा, आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ लावून 5 जूनपर्यत समाधानकारक काम झाले पाहिजे असे निर्देश त्यांनी सर्व संबंधितांना बैठकित दिले.

Post navigation

Previous: युवक काँग्रेसने वाटले पेट्रोल पंपावर मेलोडी चाॅकलेट
Next: अहिल्यादेवींच्या आदर्शांवर राज्याचा राज्यकारभार सुरु

Related Stories

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • Blog

लोकाधार October 9, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×