Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • राजकीय

July 26, 2026
2
  • राजकीय

July 26, 2026
पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन 3
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

July 23, 2026
4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

July 16, 2026
5
  • मनोरंजन
  • राजकीय

July 16, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • Blog
  • इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के
  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

लोकाधार April 16, 2026

ठाणे : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ठाणेचा इयत्ता दहावी (CBSE) परीक्षा २०२६ चा निकाल अत्यंत दैदिप्यमान लागला असून विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक परंपरेला यंदाही भक्कमपणे पुढे नेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या विद्यालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या निकालाने अधोरेखित केले आहे.

कु. सुरभी रानडे हिने ९९.६०% गुण मिळवत महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थान पटकावून विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध दिनचर्या आणि विषयांची सखोल समज यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतानाही शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य राखणे, ही तिच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची साक्ष ठरली.तसेच इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवले आहे. कु. सई खेडेकर व मास्तर संकल्प शिंदे यांनी प्रत्येकी ९६.६% गुण मिळवले, तर मास्तर श्रेयस खुले यांनी ९६% गुण प्राप्त केले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी उच्च श्रेणीत उत्तीर्ण होत आपल्या गुणवत्तेची ठळक छाप पाडली.

विद्यालयाचा एकूण निकालही उच्च टक्केवारीत लागला असून मोठ्या संख्येने विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शैक्षणिक दर्जाची साक्ष दिली आहे. या यशामागे अनुभवी व समर्पित शिक्षकवृंदाचे अथक परिश्रम, विषयप्रमुख (HOD) यांचे प्रभावी शैक्षणिक नेतृत्व, तसेच समन्वयकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन यांचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष उपक्रम, नियमित मूल्यमापन, वैयक्तिक मार्गदर्शन आणि सराव परीक्षांच्या मालिकेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी हे यश संपादन केले. या निकालाबाबत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निकिता कोठारी म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या चिकाटी, परिश्रम आणि जिद्दीचे फलित आहे. शिक्षक, विषयप्रमुख आणि समन्वयक यांच्या समर्पित कार्यामुळेच हा उत्कृष्ट निकाल शक्य झाला. पालकांचे सहकार्यही अत्यंत मोलाचे ठरले आहे. भविष्यातही अशाच उज्ज्वल यशाची अपेक्षा आहे.”प्राचार्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालय परिवाराने या यशाचा आनंद साजरा करत पुढील शैक्षणिक वाटचालीत नवे शिखर गाठण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. यावेळी उपमुख्याध्यापिका दीपाली मढवी, रुचा कळंबकर तसेच सर्व शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.

Post navigation

Previous: प्रेस नोट
Next: पी.आर. जॅग्वार्सने पटकावला टीडब्ल्यूपीएल चषकखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण  ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यातील पोलिस मैदान येथे आयोजित टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धेत पी.आर. जॅग्वार्सने व्ही.पी. पँथर्स संघाला पराभूत करत चषकावर नाव कोरले. टीडब्ल्यूपीएलचा अंतिम सामना व्ही.पी. पँथर्स विरुद्ध पी.आर. जॅग्वार्स या दोन संघात रंगला. पी.आर. जॅग्वार्ससाठी प्रथम फलंदाजी करत ५ गडी बाद ६७ धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना व्ही.पी. पँथर्स ने ५ गडी बाद ५९ धावा केल्या. पी.आर. जॅग्वार्स संघाने हा अंतिम सामना ८ धावांनी जिंकला. सामनावीर म्हणून विक्रम विश्वकर्मा (पी.आर. जॅग्वार्स) तर इंडिया आयकॉन मॅन ऑफ द सिरीज विवेक शेलार, ठाणे आयकॉन मॅन ऑफ द सिरीज जुगेश यादव यांचा सन्मान करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या महिला संघटक मीनाक्षी शिंदे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक मंदार केणी, युवासेना कार्यकारिणी सदस्य अर्जुन डाभी, नितीन लांडगे, मिलिंद चव्हाण, किरण जाधव, नितेश पाटोळे, पी. आर. जग्वार्स संघाचे मालक रोहित पिंपळकर, प्रकाश कोटवानी, व्ही पी पँथर्स संघाचे मालक विशाल जाधव, ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुडजडे, उपाध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Related Stories

  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

लोकाधार July 23, 2026
  • Blog

लोकाधार June 22, 2026
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

लोकाधार June 2, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

लोकाधार July 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×