Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • राजकीय

July 26, 2026
2
  • राजकीय

July 26, 2026
पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन 3
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

July 23, 2026
4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

July 16, 2026
5
  • मनोरंजन
  • राजकीय

July 16, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • Blog
  • प्रेस नोट
  • Blog

प्रेस नोट

लोकाधार April 10, 2026

वाहतूक सुरक्षेची शाळेतूनच रुजवात – ठाण्यात शिक्षकांसाठी अनोखी कार्यशाळा

ठाणे पोलीस आणि शिक्षण विभागाचा पुढाकार

ठाणे,
वाढत्या वाहतुक कोंडी आणि रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभाग (गृह खाते) व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ‘रस्ता वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण पथक’ स्थापन करण्याच्या उद्देशाने ठाणे विभागातील शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान ठाणे येथील वाहतूक नियंत्रण कक्षात आयोजित या उपक्रमामुळे वाहतूक सुरक्षेच्या जनजागृतीस बळ मिळणार आहे.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि शिक्षण विभाग यांच्या पुढाकारातून ‘रस्ता सुरक्षा व आपतकालीन व्यवस्थापन (RSP)’ शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे विभागातील प्रत्येक शाळेतून किमान एक शिक्षक या कार्यशाळेत सहभागी होणार आहे. या विशेष प्रशिक्षणात सकाळी आणि सायंकाळी मैदानावर परेड, वाहतूक नियमन, तसेच अंतर्गत सत्रांमधून आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार, अग्निशमन यांचे सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पोलीस उपआयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागीय समन्वय अधिकारी दिलीप स्वामी व मनिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडणार आहे. प्रशिक्षणादरम्यान सहभागींसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी सर्व शाळांना आवाहन करताना सांगितले की, “प्रत्येक शाळेत रस्ता सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण पथक कार्यरत होणे अत्यावश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे भान निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.” या प्रशिक्षणासाठी नोंदणी फी असून, गणवेश व आवश्यक साहित्य शिक्षकांना स्व:खर्चाने घ्यावे लागणार आहे. त्यानुसार सुमारे १२० शाळांमधून शिक्षक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

  • – आजचा विद्यार्थी उद्याचा सजग नागरीक वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता असते. तेव्हा, अशा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक नियंत्रण, पथ कवायत, अग्निशमन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापन यांचे सखोल शिक्षण व प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, नेतृत्वगुण, सेवाभावी वृत्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव दृढ होते. शिक्षक व प्रशिक्षित विद्यार्थी यांच्या संयुक्त सहभागातून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह, विविध राष्ट्रीय सोहळे, धार्मिक सण व स्थानिक उत्सवांमध्ये सक्रिय योगदान घेण्यात येणार आहे.
  • पंकज शिरसाट, वाहतुक उप आयुक्त.

Post navigation

Previous: ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..
Next: इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

Related Stories

  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

लोकाधार July 23, 2026
  • Blog

लोकाधार June 22, 2026
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

लोकाधार June 2, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

लोकाधार July 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×