Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • राजकीय

July 26, 2026
2
  • राजकीय

July 26, 2026
पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन 3
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

July 23, 2026
4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

July 16, 2026
5
  • मनोरंजन
  • राजकीय

July 16, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले..
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले..

लोकाधार April 3, 2026

ठाणे : शहरात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या पिकल बॉल या खेळाला चालना देण्यासाठी ठाणे पूर्व भागात नव्याने उभारण्यात आलेल्या पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पार पडले. पीपल एज्युकेशन सोसायटी आणि द्रोणाचार्य क्रीडा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

ठाण्यात यापूर्वी काही खाजगी पिकल बॉल कोर्ट उपलब्ध असले, तरी सर्वसामान्य खेळाडूंना सहज उपलब्ध होईल असे हे पहिलेच महत्त्वाचे कोर्ट मानले जात आहे. ठाणे पिकल बॉल असोसिएशनच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या उपक्रमामुळे खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.

उद्घाटन सोहळ्याला क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. पीपल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, सचिव आल्हाद जोशी, ठाणे पिकल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर डुंबरे, सचिव सचिन मोरे, अ‍ॅड. सुभाष काळे, संस्थेचे संचालक श्री. भोळे, श्री. तुरुकमाने तसेच सौ. मेधा भंडारी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नव्या कोर्टमुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पिकल बॉलसारख्या आधुनिक खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. भविष्यात अधिकाधिक युवा या खेळाकडे वळतील आणि व्यावसायिक स्तरावर संधी निर्माण होतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. या नव्या क्रीडा सुविधेमुळे ठाणे पूर्व भागातील क्रीडा संस्कृतीला नवी उभारी मिळणार असल्याचे चित्र आहे.

Post navigation

Previous: भिवंडीत ‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’महाराष्ट्रातील डिस्काउंट शॉपिंगला नवी दिशा
Next: आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

Related Stories

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

लोकाधार July 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×