Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के 1
  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

April 16, 2026
प्रेस नोट 2
  • Blog

प्रेस नोट

April 10, 2026
ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा.. 3
  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

April 10, 2026
आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार 4
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

April 7, 2026
ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले.. 5
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले..

April 3, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • Blog
  • ठाण्यात अर्ज मागे घेणाऱ्या ‘त्या’ उमेदवारांविरोधात शिवसेना – मनसेची पोलीसांत धाव
  • Blog

ठाण्यात अर्ज मागे घेणाऱ्या ‘त्या’ उमेदवारांविरोधात शिवसेना – मनसेची पोलीसांत धाव

लोकाधार January 5, 2026

राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी श्रीनगर पोलिसांना दिले निवेदन

ठाणे,
ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेत शिंदेंच्या साथिदारांना ‘बिनविरोध’ निवडुन येण्यास साह्य करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तिन्ही उमेदवारांसह संबधित पोलीसावर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी शिवसेनेचे राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी श्रीनगर पोलीसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर पोलिसांनी निवडणुक आयोगाकडून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासित करण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनाही यासंदर्भात अवगत करून तातडीची कारवाई करण्याची विनंती केल्याचेही विचारे व जाधव यांनी सांगितले.
ठाणे महापालिका निवडणुकी दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाग क्रमांक ५ ‘ब’ दादाभाऊ रेपाळे, प्रभाग क्रमांक १८ ‘ब’ च्या स्नेहा नांगरे आणि प्रभाग क्रमांक १८ ‘ड’ चे उमेदवार विक्रांत घाग ह्यांना पक्षातर्फे ‘एबी’ फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी घोषित केली होती. मात्र, तिघांनीही पक्षाला न कळविता परस्पर माघार घेत शिंदेच्या साथीदारांना बिनविरोध निवडून येण्यास मदत केली. ही बाब राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी गांभिर्याने घेतली आहे. या अनुषंगाने रविवारी श्रीनगर पोलीस ठाण्यात या तिघा उमेदवारांविरोधात सेना – मनसेने निवेदन सादर करून तिघांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटल्यानुसार, सत्ताधाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून तसेच, पैशांचे आमिष दाखवून या तिघांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश असुन त्या पोलीसाने विक्रांत घाग या उमेदवाराला एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यात नेले होते. या चित्रिकरणाचे पुरावे सोशल मिडिया तसेच सर्व प्रसार माध्यमांवरही झळकले आहेत. त्यामुळे, ही बाब गंभीर असुन एक प्रकारे पोलीस खात्यालाही लांच्छनास्पद आहे. किंबहुना, परस्पर माघार घेणाऱ्या उमेदवारांनी त्या – त्या प्रभागातील मतदारांशी केलेली ही प्रतारणा आहे. तेव्हा, सत्ताधारी व सरकारी यंत्रणांनी मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून लोकशाहीच संपुष्टात आणली आहे. त्यामुळे निवडणुक अधिकाऱ्यांशी संगनमत करून सत्ताधाऱ्यांनी केलेल्या या गैरप्रकाराबद्दल नागरिकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने संबधित पोलीसासह त्या तिन्ही उमेदवारांवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा, अशा चुकीच्या पायंड्यामुळे लोकशाहीवरील विश्वास उडून नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होईल. असा इशारा राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Post navigation

Previous: Previous Post
Next: कृपया प्रसिद्धीसाठी

Related Stories

  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

लोकाधार April 16, 2026
  • Blog

प्रेस नोट

लोकाधार April 10, 2026
  • Blog

शासकीय व निमशासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न; ठाणे कॉप्स विजेते

लोकाधार March 31, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

लोकाधार April 16, 2026
  • Blog

प्रेस नोट

लोकाधार April 10, 2026
  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

लोकाधार April 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

लोकाधार April 7, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×