Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

February 28, 2026
2
  • राजकीय

February 27, 2026
कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

February 17, 2026
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

February 17, 2026
5
  • ताज्या बातम्या

February 17, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • Blog
  • Blog
लोकाधार December 16, 2025

ठाणे व्हिजन २०४७, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य विषयावर परिसंवाद


ठाणे :

ठाण्यातील सतीश महाविद्यालयाच्या वतीने ठाणे व्हिजन भूतकाळ यावर आधारित परिसवांदाचे आयोजन y

सतीश प्रधान महाविद्यालयाचे संस्थापक आणि ठाण्याच्या नगर विकास, क्रीडा, कला आणि संस्कृतिक क्षेत्रावर आपला ठसा उमटवणारे सतीश प्रधान यांचे दिनांक २९/१२/२०२४ रोजी देहावसान झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून त्यांनी दिलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करण्यासाठी त्यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यासाठी सतीश प्रधान महाविद्यालयाने अक्षतांजली या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये २९ नोव्हेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून १८ डिसेंबर २०२५ रोजी ठाणे व्हिजन २०४७, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला आहे.
या परिसंवादाचा उद्देश ठाण्याच्या जडण घडणीमध्ये प्रधान यांच्या शहरी नियोजनाचे काम लक्षात घेऊन ठाण्याच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक पायाभूत सुविधांचा मागील काळातील सद्य स्थितीतील आणि आगामी काळातील परिस्थितीचा शोध घेणे त्यावर संशोधन घडवून आणणे हा आहे.
या परिसंवादात विविध क्षेत्रातील तज्ञ सहभागी होणार आहेत. या मध्ये SMC infrastructure चे श्री. सुहास मेहता, ज्येष्ठ पत्रकार श्री. कुमार केतकर, शहरी नियोजनकार श्रीमती सुलक्षणा महाजन आणि अभियंते, नियोजन अधिकारी आणि प्रशासकीय आधिकारी या परिसंवादात आपले विचार मांडणार आहेत.
या परिसंवादाच्या निमित्ताने महाविद्यालयीन शिक्षक, नियोजक, नेते , नवोदित संशोधक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून श्री. सतीश प्रधान यांच्या विचारांचा वारसा जतन करून नागरी नियोजन, पायाभूत सुविधा, वाहतूक, शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक केंद्रित प्रशासन या विषयांवरील ठोस सूचना आणि शिफारसी राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांना सादर करण्यात येतील. हीच सतीश प्रधान यांना खरी आदरांजली ठरेल.

Post navigation

Previous: Previous Post
Next: Next Post

Related Stories

  • Blog

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची “चार्जिंग!”

लोकाधार January 27, 2026
  • Blog

लोकाधार January 27, 2026
  • Blog

मानव केंद्रीभूत विकास हवा !- पदमश्री चैत्राम पवार

लोकाधार January 20, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×