
‘ग्लोब ट्रॉटर’ इव्हेंटच्या घोषणेनंतर लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे भारतीय शोकेस ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. सर्वप्रथम चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा पृथ्वीराजचा कुंभा या भूमिकेतील फर्स्ट लुक समोर आला. त्यांचा लुक समोर येताच तो इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल झाला आणि देशभरात लोकांची उत्सुकता अधिकच वाढली.
त्यात भर म्हणजे, ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने जगभरातील प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहण्याचे आवाहन केले, आणि त्यामुळे वातावरण अजूनच तापले.
आता या उत्साहात आणखी रंग भरत, मेकर्सनी ‘ग्लोब ट्रॉटर’ हे गाणं रिलीज केलं आहे, ज्यात श्रुती हासनची अप्रतिम ऑन-स्क्रीन उपस्थिती पाहायला मिळते.
या गाण्याला एम. एम. कीरवाणी यांनी संगीत दिलं आहे, तर श्रुती हसन आणि काला भैरव यांनी हे गाणं गायले असून, त्याचे बोल चैतन्य प्रसाद यांनी लिहिले आहेत. हे गाणं खूपच दमदार आहे.
मेकर्सनी गाणं शेअर करताना लिहिलं आहे —
“जगातील सर्वात मोठ्या शोची सुरुवात करणारे गाणं आता #GlobeTrotter गाणं ऐका आणि १५ नोव्हेंबरला @shrutihaasan च्या खास लाईव्ह परफॉर्मन्ससाठी तयार व्हा.”
वातावरण प्रचंड रंगात आलं आहे आणि देशभरात उत्सुकता वाढत आहे. ग्लोब ट्रॉटर इव्हेंट भारतीय मनोरंजनाच्या इतिहासातील एक खास क्षण ठरणार आहे.
फॅन्स अनेक वर्षांपासून या कोलॅबोरेशनची वाट पाहत होते, आणि आता तो उत्साह शिगेला पोहोचला आहे. एस. एस. राजामौली — ज्यांनी भारतीय सिनेमाला जगभरात नवी ओळख मिळवून दिली — आता सुपरस्टार महेश बाबूसोबत मिळून हा अत्यंत खास आणि सर्वाधिक प्रतिक्षित इव्हेंट साकारत आहेत.