
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. बहिणीवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा जाब विचारण्यासाठी रुपाली ठोंबरे खडक पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यासोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी रूपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रुपाली पाटील (Rupali Patil) यांची बहीण आणि इतर तीन जणावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यांतर त्या चांगल्याच संतापल्या होत्या. रुपाली पाटील यांनी पोलीस स्थानकात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यासोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्या पोलिसांवरही संतापल्या होत्या. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.