Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • राजकीय

July 26, 2026
2
  • राजकीय

July 26, 2026
पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन 3
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

July 23, 2026
4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

July 16, 2026
5
  • मनोरंजन
  • राजकीय

July 16, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय
लोकाधार June 2, 2026

शहरातील नालेसफाईच्या कामांचा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला आढावा

ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सद्यस्थिपतीत सुरू असलेल्या नालेसफाईची सर्वच कामे 5 जूनपर्यत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आजपर्यत झालेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेत असताना मुंब्रा व दिवा प्रभागसमितीतील नाल्यांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी संबंधित विभागांना दिल्या. यावेळी शहरातील नालेसफाईची 80 टक्के कामे पूर्ण झाली असून 5 जूनपर्यत सर्व कामे पूर्ण होतील असे घनकचरा व बांधकाम विभागामार्फत सांगण्यात आले.

        या बैठकीस उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मधुकर बोडके, दीपक झिंजाड, डॉ. मिताली संचेती, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

        ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नालेसफाईच्या कामासाठी ज्या ठिकाणी कमी मनुष्यबळ होते त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाद्वारे युध्दपातळीवर कामे सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी नमूद केले. तसेच याबरोबरच खाडीमुख, रेल्वेशेजारील कलव्हर्ट साफसफाईची माहिती यावेळी देण्यात आली. नालेसफाईनंतरही काही नाल्यात डोंगराळ भागातून कचरा वाहत येत असून  तो काढण्याचेही काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

        शहरातील सखल भाग तसेच काही ठिकाणी तबेले, गोठे आहेत, त्या ठिकाणची पाहणी करुन घ्यावी. काही ठिकाणी गोठ्यातील चारा हा नाल्यात गेल्यामुळे पाण्याचा मार्ग थांबला असल्याचे निदर्शनास आले होते, त्या पार्श्वभूमीवर शहरात ज्या ठिकाणी तबेले गोठे आहेत ते स्वच्छ आहेत किंवा कसे याची पाहणी करण्याच्या सूचनाही श्री. रोडे यांनी यावेळी दिल्या.

        तसेच नालसफाई झाल्यानंतर संबंधित विभागातील लोकप्रतिनिधींना घेवून नाल्यांची पाहणी करावी, त्यांच्या काही सूचना असल्यास त्याची अंमलबजावणी करावी. तसेच अतिवृष्टीच्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधींना संपर्कात रहावे. तसेच त्यांच्या सूचनांचे पालन करावे असेही बैठकीत नमूद करण्यात आले.

        ठाणे शहरात कोस्टल रोड, बुलेट ट्रेनची कामे सुरू असून या ठिकाणी देखील संबंधित सहायक आयुक्त व कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी करावी. या कामाच्या ठिकाणी जर अतिवृष्टीत पाणी साचले तर पाणी जाण्यासाठी मार्ग आहे किंवा कसे याची  तपासणी करावी व तशा पध्दतीने काम करुन घ्यावे अशा सूचनाही अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी दिल्या.

सर्व सहायक आयुक्तांनी पाहणी करावी

प्रत्येक प्रभाग समितीतील नाल्यांची साफसफाईच्या कामांचा आढावा संबंधित सहायक आयुक्तांनी पाहणी करुन घ्यावा. याबाबत आवश्यक यंत्रसामुग्री, मनुष्यबळाची गरज भासल्यास त्याबाबत सहकार्य करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

प्रभागसमितीस्तरावर आपत्कालीन कक्ष कार्यान्वित

महापालिका मुख्यालयात मुख्य आपत्कालीन कक्ष 24×7 सुरू आहे. याच पध्दतीने मान्सून कालावधीत प्रत्येक प्रभागसमितीत आजपासून आपत्कालीन कक्ष कार्यान्वि्त करण्यात आला आहे. या कक्षातील दूरध्वनी, इतर यंत्रणांची समक्ष पाहणी करावी. तसेच मान्सून काळात या कक्षाशी संपर्कात् राहण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी दिल्या. .

Post navigation

Previous: ठाणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई;
Next: महायुतीच्या सर्व १७ जागांवर विजय निश्चित

Related Stories

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

लोकाधार July 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×