Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

ठ 1
  • राजकीय

ठ

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 1003963582 2
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

August 23, 2026
ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर 3
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

August 23, 2026
निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण   4
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

August 16, 2026
ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट  5
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट 

August 11, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
लोकाधार November 29, 2025

लोकशाही सतीश प्रधान यांच्या पुण्यस्मरण निमित्त अक्षतांजली कार्यक्रम संपन्न निवडून आलेल्या ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष, प्रथम महापौर, खासदार आणि ज्ञानसाधना, ठाणे संस्थेचे दिवंगत अध्यक्ष सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित अक्षतांजली या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. अक्षतांजली अंतर्गत 28 नोव्हेंबर 2025 ते 29 डिसेंबर 2025 या एका महिन्याच्या कालावधीत 11 विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात येत आहे. आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भव्य रोजगार मेळावा, रक्तदान शिबिर, एक दिवसीय परिषद आता अनेक कार्यक्रमांचा यात समावेश आहे.
अक्षतांजलीच्या या पहिल्या कार्यक्रमात ठाण्यावर विशेष प्रेम करणाऱ्या सतीश प्रधान यांचा विचार लक्षात घेऊन सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाकडून ‘ठाणे अभिमान गीताचे’ लोकार्पण करण्यात आले. गीतकार प्रवीण दवणे, वैशाली सामंत आणि श्रीरंग भावे यांनी गायलेले आणि स्वरूप होनप यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणातून अधिक कल्पकतेने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. पोलीस बँड पथकातील वादकांनी या गीतासाठी वादन केलेले आहे.
अक्षतांजलीच्या या पहिल्या कार्यक्रमात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, खासदार नरेश म्हस्के इत्यादी मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.
“सतीश प्रधान केवळ राजकारणात सक्रिय नव्हते, त्यांनी केवळ राजकारण केलं नाही. तर सबंध ठाणेकरांच्या गरजा लक्षात घेऊन ठाण्याच्या क्रीडा, संस्कृती, शिक्षण आणि कला अशा सर्वच क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडियम उभारणारे सतीश प्रधान खऱ्या अर्थाने बहुआयामी ठरतात. तत्कालीन त्यांचे राजकीय सहकारी मो.दा. जोशी, प्रकाश परांजपे यांनी जोशी या सर्वच दिग्गजांच्या हृदयात ठाण्याबद्दल स्नेह आणि प्रेम होते. दादोजी स्टेडियम उभारताना त्यावेळी त्यांनी केलेले ठराव विशेष महत्त्वाचे होते, त्याची कल्पना त्यांनी मलाही दिली होती. सतीश प्रधान यांच्यात बरेचदा बाहेरून फणसासारखे परंतु त्यांच्या अंतरंगात रसाळ प्रेमळ हृदय असलेले व्यक्तिमत्व आणि अनेकांशी स्नेहाचे सलोखाचे संबंध असणारे व्यक्तिमत्व मला भासते. अशा ठाणेकराला मी मानाचा मुजरा करतो.” अशा शब्दांत आमदार संजय केळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्या विद्यार्थीदशेतील अविस्मरणीय अनुभव आपल्या सहज शैलीत लोकांसमोर मांडले. “सतीश प्रधान या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला कायमच अभिमान वाटतो. त्या काळात केवळ 35 टक्के असणारे विद्यार्थीच महाविद्यालयात प्रवेश घेत होते असे नाही. मी, मकरंद जोशी, चित्रपट सृष्टीतील डॉल्फी फर्नांडिस यांसारखे विद्यार्थी चांगले गुण असतानाही केवळ प्रवीण दवणे, अशोक बागवे, जयप्रकाश घुमटकर, प्रदीप ढवळ यांसारख्या शिक्षकांमुळे ज्ञानसाधना महाविद्यालयाशी जोडले गेलो. माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी ज्ञानसाधना महाविद्यालयामुळे घडले. कॉलेजमध्ये शिकत असताना फी वाढीविरोधात असो वा इतर समस्या असो विद्यार्थ्यांसाठी मी असंख्य आंदोलने केली, प्रधान साहेबांचा निषेधही केला. परंतु त्यांनी माझा विरोध न करता माझे म्हणणे ऐकून घेतले आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. हा त्यांचा मोठेपणा आहे”, असे ते म्हणाले. त्यांनी कमलेश प्रधानांची प्रशंसा करताना ज्ञानसाधना महाविद्यालयाला प्रगतीपथावर नेण्याचे काम तुम्ही करत आहात, यात कुठलीही मदत लागली तर माझ्यासह असंख्य माजी विद्यार्थी तुमच्यासमोर आहेत, हे तुमचे नाही तर आम्हा माझी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय आहे असे आश्वासन त्यांनी कमलेश प्रधानांना दिले.
“अक्षतांजली म्हणजे प्रधान साहेबांना अर्पण केलेला हा कार्यक्रम नाही, तर प्रधान साहेबांप्रती ती एक पवित्र भावना आहे. ठाणे शहराचे वैभव उंच इमारतींमधून नाही तर ठाण्यातील कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये ठाणे शहराला एक नवा आयाम प्राप्त व्हावा यासाठी प्रधान साहेबांनी उभारलेल्या गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडियम, तरणतलाव, ज्ञानसाधना महाविद्यालय यात आहे.

Post navigation

Previous: “ज्यांनी लावली कराडची वाट,त्यांना नारळ देऊन दाखवा घरची वाट!”
Next: “कोपरीत ‘माझ्या पोलीस स्टेशनला भेट द्या’ला जोरदार प्रतिसाद”

Related Stories

  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट 

लोकाधार August 11, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

ठ

लोकाधार August 27, 2026
1003963582
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×