Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • मनोरंजन
  • राजकीय

October 17, 2026
2
  • Blog

October 9, 2026
टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा 3
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

October 8, 2026
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण 1003986974-1024x683.jpg 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ 1003963582 5
  • Blog
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ

August 23, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • Blog
  • ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ
  • Blog
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ

लोकाधार August 23, 2026

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात.

यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post navigation

Previous: ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर
Next: ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

Related Stories

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • Blog

लोकाधार October 9, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • मनोरंजन
  • राजकीय

लोकाधार October 17, 2026
  • Blog

लोकाधार October 9, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय
  • व्हिडिओ

टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी ; श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा महासोहळा

लोकाधार October 8, 2026
1003986974-1024x683.jpg
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण

लोकाधार August 27, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×