Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

ठ 1
  • राजकीय

ठ

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 1003963582 2
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

August 23, 2026
ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर 3
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

August 23, 2026
निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण   4
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

August 16, 2026
ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट  5
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट 

August 11, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • राजकीय
  • “१५ लाख रिक्षावाल्यांचा दावा खोटा; ‘संप करा नाहीतर परत जा’ – अविनाश जाधवांचा इशारा”
  • मनोरंजन
  • राजकीय

“१५ लाख रिक्षावाल्यांचा दावा खोटा; ‘संप करा नाहीतर परत जा’ – अविनाश जाधवांचा इशारा”

लोकाधार April 24, 2026

ठाणे –

राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाण्यात वाद तीव्र झाला आहे. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी या निर्णयाला विरोध दर्शवत मोठ्या प्रमाणावर संपाचा इशारा दिला आहे. सुमारे १५ लाख चालक रस्त्यावर उतरतील, असा दावा संघटनांकडून करण्यात आला आहे. दरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनी अमराठी रिक्षा चालकांचा नेमका आकडा किती? याचा थेट पुरावाच दिला आहे. तसेच १ तारखेला तुम्ही संप करा नाहीतर यूपी-बिहारला परत जा आम्हाला काही फरक पडणार नाही असा इशाराही परप्रांतीय रिक्षा चालकांना दिला आहे.

राज्यात परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी १ मेपासून मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिल्यानंतर रिक्षा, टॅक्सीचालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. परवाने रद्द केल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे या निर्णयाला रिक्षा, टॅक्सीचालक संघटनांनी थेट विरोध दर्शविला आहे. यावर ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी परप्रांतीय रिक्षा चालकांना १ तारखेला तुम्ही संप करा नाहीतर यूपी-बिहारला परत जा आम्हाला काही फरक पडणार नाही असा थेट इशारा दिला आहे. तसेच समाज माध्यमांवर पोस्ट करत अमराठी रिक्षा चालकांचा नेमका आकडा किती? याचा थेट पुरावाच दिला आहे.
काय म्हणाले अविनाश जाधव?
४ दिवसांपासून ऐकतोय १५ लाख रिक्षावाले संपावर जाणार आहेत. खरतर मुंबई आणि ठाणे, रायगड मध्ये ४ लाख रिक्षा आहेत. त्यातून ६०-६५% रिक्षा चालक हे मराठी आहेत, मग यूपी -बिहार वरून संपासाठी आणखीन रिक्षा मागवणार आहेत का ? खोटे आकडे सांगून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम काही लोक करत आहेत, ह्या सगळ्यांना सांगतो १ तारखेला तुम्ही संप करा नाहीतर यूपी-बिहार ला परत जा आम्हाला काही फरक पडणार नाही. खात्रीने सांगतो एकही माणूस १ तारखेला रिक्षाची वाट बघत थांबणार नाही, वेळप्रसंगी आम्ही आमच्या गाड्या काढू लोकांना घरापर्यंत पोहचवायला. महाराष्ट्रात आम्हाला चैलेंज करायला जाऊ नका… लई महागात पडेल, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला आहे.

परवाना तपासणीची प्रक्रिया
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या परवान्यांची नव्याने तपासणी सुरू करण्यात आली आहे. चालकाला साध्या मराठीत संवाद साधता येतो का, याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. केवळ कागदोपत्री अट पूर्ण करणे पुरेसे नसून बोलणे आणि समजणे आवश्यक असेल. स्थानिक भाषा शिकण्यास इच्छुक चालकांना मदत केली जाईल; मात्र जाणीवपूर्वक नियम टाळणाऱ्यांवर कारवाई करत परवाने रद्द केले जाऊ शकतात.

Post navigation

Previous: सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात दीक्षांत समारंभाचे आयोजन……
Next: कोपरीतील मलनिस्सारणप्रकल्प ठरला पांढरा हत्ती!

Related Stories

  • राजकीय

ठ

लोकाधार August 27, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

ठ

लोकाधार August 27, 2026
1003963582
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×