Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

ठ 1
  • राजकीय

ठ

August 27, 2026
ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 1003963582 2
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

August 23, 2026
ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर 3
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

August 23, 2026
निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण   4
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

August 16, 2026
ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट  5
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट 

August 11, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • भिवंडीत ‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’महाराष्ट्रातील डिस्काउंट शॉपिंगला नवी दिशा
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

भिवंडीत ‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’महाराष्ट्रातील डिस्काउंट शॉपिंगला नवी दिशा

लोकाधार April 1, 2026

अत्याधुनिक ‘रिटेलटेनमेंट हब’ (खरेदी आणि मनोरंजनाचे ठिकाण) म्हणून डिझाइन केलेल्या या मॉलमध्ये, १५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना असणार आहेत. ‘ऑलवेज ऑन डिस्काउंट’ (Always On Discount) या स्वरूपात वर्षभर सवलती उपलब्ध असतील, ज्यामुळे ग्राहकांना प्रीमियम फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादने आकर्षक किमतीत खरेदी करण्याचा आनंद मिळवता येईल. अरमानी एक्सचेंज, सुपरड्राय, लॅकोस्टे, लिवाइज, एसिक्स, कॅल्विन क्लाइन, टॉमी हिलफिगर, जॅक अँड जोन्स, वेरो मोडा यासारखे आघाडीच्या ब्रँड्स या मॉलमध्ये दाखल होत आहेत. उंची ब्रँड्सचे कपडे, पादत्राणे आणि अ‍ॅक्सेसरीज अशा विविध श्रेणीतील उत्पादनांची मनोसोक्त खरेदी याठिकाणी करता येईल.

‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’ची संकल्पना केवळ खरेदीपुरती मर्यादित नाही. अतिशय आनंद व समाधान देणारे, कायम लक्षात राहतील असे अनुभव देणारे ठिकाण म्हणून याची ख्याती निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे. याठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी यावे आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन मनोरंजनाचा आनंद घ्यावा यासाठी मनोरंजनाला केंद्रस्थानी ठेवले आहे. या मॉलमध्ये तब्बल २,५०० आसनक्षमता असलेले भव्य ‘ओपन-एअर अ‍ॅम्फीथिएटर’ (खुले नाट्यगृह) आहे, इथे वर्षभर लाइव्ह कॉन्सर्ट्स, स्टँड-अप कॉमेडी, ब्रँड लॉन्चेस आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन असे भरपूर कार्यक्रम होतील. याला जोडूनच १ एकरांवर पसरलेले, खूप मोठे ‘क्युरेटेड फ्ली मार्केट’ असेल, जिथे विविध पॉप-अप स्टॉल्स, इंडी ब्रँड्स असतील आणि अनेक नवनवीन अनुभव घेता येतील. यामुळे याठिकाणी एक चैतन्यमय आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण होईल, आणि ग्राहकांना याठिकाणी वारंवार भेट द्यावीशी वाटेल.

भूमी वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाश पटेल म्हणाले,“आउटलेट मॉल ऑफ इंडिया हे भिवंडीचे एका उत्साही रिटेल आणि मनोरंजन केंद्रामध्ये होत असलेल्या रूपांतराचे प्रतीक आहे. विशेषतः तरुण पिढीला आंतरराष्ट्रीय उत्पादने सहज उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांना नामवंत ब्रँड्स, मनाला आनंद देणारी जागा आणि वर्षभर अतुलनीय मूल्य (डिस्काउंट) यांचा अनुभव घेता येईल, असा एक प्रीमियम आणि संघटित आउटलेट प्लॅटफॉर्म तयार करणे हे आमचे व्हिजन आहे.”

या प्रकल्पामध्ये या प्रदेशातील सर्वात महत्त्वाकांक्षी ‘फूड अँड बेव्हरेज’ इकोसिस्टम विकसित करण्यात आली आहे, जी भिवंडीतील संघटित डायनिंग क्षेत्रातील मोठी उणीव भरून काढेल. येथील विशेष ‘फूड अव्हेन्यू’ मध्ये निवडक क्यूएसआर, फाईन डायनिंग आणि सहा ‘रूफटॉप’ रेस्टॉरंट्सचा समावेश असणार आहे. खरेदीबरोबरीनेच या सर्वांचा आनंद ग्राहकांना घेता येईल. येथील मुख्य आकर्षण म्हणजे २५,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली महाराष्ट्रातील एक सर्वात मोठी ‘फ्लॅगशिप ब्रुअरी’ असणार आहे. त्याचप्रमाणे

याठिकाणी २० हून जास्त ‘फूड ट्रक्स’ असतील. त्यामुळे अतिशय उत्साही वातावरणाचा अनुभव घेता येईल. याव्यतिरिक्त, येथे अत्याधुनिक ‘गोल्फिंग’ आणि ‘गो-कार्टिंग’ सुविधा देखील उपलब्ध असून, ग्राहकांना मनोरंजनाचा एक परिपूर्ण अनुभव मिळेल.

भूमी वर्ल्डच्या विस्तीर्ण परिसरामध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या प्रकल्पाला समृद्धी महामार्ग आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या प्रमुख पायाभूत सुविधांचा मोठा फायदा मिळणार आहे. याचा विस्तार भिवंडी, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईपर्यंत पसरलेला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर स्थित असल्याने, मुंबई महानगर प्रदेशातून याठिकाणी सहज येणे-जाणे देखील सहजशक्य आहे.

Post navigation

Previous: शासकीय व निमशासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न; ठाणे कॉप्स विजेते
Next: ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले..

Related Stories

  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट 

लोकाधार August 11, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

ठ

लोकाधार August 27, 2026
1003963582
  • Blog

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह-निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे मा. डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा.’सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे बिरुदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो; तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला (वेतन) त्यांना दिला जातो.कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेल्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षीसुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून घेण्यात आली आहे.या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्र, जुने आर.टी.ओ. ऑफिस, ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीस, सतरंज्या/दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८:३० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर

लोकाधार August 23, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  

लोकाधार August 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×