Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

1
  • राजकीय

July 26, 2026
2
  • राजकीय

July 26, 2026
पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन 3
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

July 23, 2026
4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

July 16, 2026
5
  • मनोरंजन
  • राजकीय

July 16, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • Blog
  • ठाण्यात ‘कलर्स ऑफ बॉलीवूड’चा जलवा; चैत्र नवरात्रोत्सवात जुन्या गाण्यांच्या तालावर महिला थिरकल्या
  • Blog

ठाण्यात ‘कलर्स ऑफ बॉलीवूड’चा जलवा; चैत्र नवरात्रोत्सवात जुन्या गाण्यांच्या तालावर महिला थिरकल्या

लोकाधार March 23, 2026

ठाणे : जांभळी नाका येथील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सव दिवसेंदिवस जल्लोषात साजरा होत आहे. या उत्सवाच्या चौथ्या माळेला ‘कलर्स ऑफ बॉलीवूड’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किरण वेहेले आणि त्यांच्या टीमने सादर केलेल्या सुश्राव्य गाण्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला, तर उपस्थित महिलांनी जुन्या गाण्यांच्या तालावर ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटला.

प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि आग्रहास्तव हा कार्यक्रम तब्बल चार तास रंगला. बॉलीवूडच्या सुवर्णकाळातील गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या सोहळ्याला ‘एनडीटीव्ही’ (NDTV) चे एक्झिक्युटिव्ह एडिटर माननीय श्री. जीतेंद्र दीक्षित यांनी सहकुटुंब उपस्थित राहून देवीची मनोभावे पूजा आणि आरती केली. तसेच आमदार मा. श्री. जगन्नाथ अभ्यंकर यांनी शिक्षक वर्गासह उपस्थित राहून दर्शन घेतले. व युवानेते अविष्कार भुसे आणि त्यांच्या पत्नी सौ. लतीषा भुसे-विचारे यांनीही आदिशक्तीचे दर्शन घेऊन उत्सवात सहभाग नोंदवला. त्यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, शहरप्रमुख अनिश गाढवे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शहाजी खुस्पे उपस्थित होते. नवरात्रोत्सवाचा विशेष सोहळा रंगणार आहे. निलेश ठक्कर प्रस्तुत ‘गुजराती दांडिया रास गरबा’ हे आजच्या दिवसाचे मुख्य आकर्षण असेल. याच कार्यक्रमात गुजराती, कच्ची आणि जैन समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या मंगलप्रसंगी वैष्ण्वाचार्य पु. पा. गो. १०८ श्री. द्रूमीलकुमारजी महोदय यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व पत्रकार, छायाचित्रकार या सोहळ्याला उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.

Post navigation

Previous: ‘ बिट्टू बॉस ‘ला अखेरचा निरोप..
Next: Next Post

Related Stories

  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

लोकाधार July 23, 2026
  • Blog

लोकाधार June 22, 2026
  • Blog

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

लोकाधार June 2, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • राजकीय

लोकाधार July 26, 2026
  • Blog

पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी करून दिले नवजीवन

लोकाधार July 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

लोकाधार July 16, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×