Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के 1
  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

April 16, 2026
प्रेस नोट 2
  • Blog

प्रेस नोट

April 10, 2026
ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा.. 3
  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

April 10, 2026
आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार 4
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

April 7, 2026
ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले.. 5
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले..

April 3, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • ताज्या बातम्या
  • हजारो मतदारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी भरले अर्ज
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

हजारो मतदारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी भरले अर्ज

लोकाधार December 29, 2025

ठाणे –

हजारो मतदारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार प्रकाश बर्डे, प्रकाश पाटील, वर्षा मोरे, दिपा गावंड यांनी आज प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग 23 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सुमारे 10 ते 12 हजार लोक सहभागी झाले होते. या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, ” वाजवा तुतारी… गाडा गद्दारी”, असा नारा दिला.

सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, ठाणे महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 25 मधील उमेदवार प्रकाश बर्डे, वर्षा मोरे, यांनी कळवा पूर्व येथून प्रचंड रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, दुपारी बारा वाजता प्रभाग क्रमांक 23 मधून प्रकाश पाटील आणि दिपा गावंड यांची रॅली निघाली. या रॅलीतही प्रचंड जनसमुदाय एकवटला होता. या दोन्ही रॅलींमध्ये डाॅ.जितेंद्र आव्हाड हेदेखील सहभागी झाले होते. या दोन्ही रॅली कळव्यातील घड्याळ चौकात एकत्र आल्या तेव्हा सबंध परिसर लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता.या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अर्ज दाखल करताना उसळलेला जनसमुदाय पाहता, लोकांना विकास हवा आहे, हेच स्पष्ट होत आहे. कळव्यातील मतदार हे विकासाला मतदान करणार असल्याचे दिसत आहे. कळवा पूर्वेतील झोपड्यांवर जेव्हा कारवाई करण्यात येणार होती. तेव्हा आपणच चार तास रेल रोको करून झोपड्या वाचविल्या होत्या. कधीकाळी आठ ते दहा हजारात विकल्या जाणाऱ्या झोपड्या आता पंधरा ते वीस लाखांत विकल्या जात आहेत. याला कारण कळवा विकसित होत आहे. येथील पाण्याची, विजेची समस्या मार्गी लागली आहे. अगदी डोंगरपट्ट्यातील गल्ल्यादेखील काँक्रिटीच्या केल्या आहेत. वाहतूक कोंडीची थोडीफार समस्या असली तरी लवकरच नवे रस्ते तयार करून ती समस्याही मार्गी लावण्यात येणार आहे.खा. श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपले खासदार हुशार आहेत. ते डाॅक्टर आहेत. पण, ते सांगतात की घरगुती गॅसची वाहिनी अंबरनाथमधून आली आहे. पण, ही वाहिनी ठाण्यातून आली आहे. आपणच तिचे स्वागत केले होते. जर ही वाहिनी अंबरनाथमधून आली असती तर कळव्यात आधी घरगुती गॅस पुरवठा झाला नसता.
क्लस्टरबाबत डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, क्लस्टर आणून येथील गोरगरीबांचे घरसंसार उद्ध्वस्त करण्यास माझा विरोध आहे. एकाच बिल्डरला क्लस्टरच्या नावाखाली इथल्या जमिनी देऊन नवीन जमीनदार पद्धती सुरू करण्यास माझा विरोध असणार आहे, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.

Post navigation

Previous: Previous Post
Next: प्रेस नोट

Related Stories

  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

लोकाधार April 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

लोकाधार April 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले..

लोकाधार April 3, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

लोकाधार April 16, 2026
  • Blog

प्रेस नोट

लोकाधार April 10, 2026
  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

लोकाधार April 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

लोकाधार April 7, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×