Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन 1
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

February 28, 2026
2
  • राजकीय

February 27, 2026
कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल 3
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

February 17, 2026
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण 4
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

February 17, 2026
5
  • ताज्या बातम्या

February 17, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • Blog
  • “ठाकरे ब्रॅण्ड” महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा बॅण्ड वाजवणार…
  • Blog

“ठाकरे ब्रॅण्ड” महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा बॅण्ड वाजवणार…

लोकाधार December 24, 2025

ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा एकत्रित जल्लोष

ठाणे :
मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत जाहिर करताच ठाण्यात एकच जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील विष्णुनगर येथील कार्यालयाबाहेर गुलाल उधळून फटाके फोडत मिठाई वाटण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यानी आता “ठाकरे ब्रॅण्ड” सर्व महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा बॅण्ड वाजवणार असल्याचा इशारा देण्यात आला.
राज्यातील २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १५ जानेवारी रोजी मतदान केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, १९ वर्षानंतर शिवसेना आणि मनसेने युती केली. दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्यानंतर ठाण्यात जल्लोष करण्यात आला. मनसेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, महिला शहर प्रमुख समिक्षा मार्कंडे यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा, विष्णुनगर येथील मनसे मुख्यालयासमोर गुलाल उधळुन फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. या जल्लोषात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे हे देखील सहभागी झाले होते. दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्याने महाराष्ट्र विशेषतः मराठी माणुस सुखावल्याची प्रत्येक कार्यकर्त्याची भावना होती. किंबहुना, जल्लोष केल्यानंतर शिवसेना – मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी राज्यात आता “ठाकरे ब्रॅण्ड” च चालणार असुन येत्या निवडणुकीत हा ठाकरे ब्रॅण्ड सर्व महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा बॅण्ड वाजवणार असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मनसे कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि ठाकरे समर्थक नागरीक उपस्थित होते.

Post navigation

Previous: ठाणे कारागृहाची नाताळ उत्पादने, साडेचार लाखांचे उत्पन्न
Next: ठाण्यात काँग्रेसला खिंडार…

Related Stories

  • Blog

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची “चार्जिंग!”

लोकाधार January 27, 2026
  • Blog

लोकाधार January 27, 2026
  • Blog

मानव केंद्रीभूत विकास हवा !- पदमश्री चैत्राम पवार

लोकाधार January 20, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मल्लखांब स्पर्धेचे यशस्वी आयोजन

लोकाधार February 28, 2026
  • राजकीय

लोकाधार February 27, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन

कुरकुरीत चवीची धमाल! मालवणी महोत्सवात ‘आनंदवन भेळ’ची कमाल

लोकाधार February 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

लोकाधार February 17, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×