Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के 1
  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

April 16, 2026
प्रेस नोट 2
  • Blog

प्रेस नोट

April 10, 2026
ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा.. 3
  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

April 10, 2026
आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार 4
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

April 7, 2026
ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले.. 5
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले..

April 3, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • Blog
  • ठाणे कारागृहाची नाताळ उत्पादने, साडेचार लाखांचे उत्पन्न
  • Blog

ठाणे कारागृहाची नाताळ उत्पादने, साडेचार लाखांचे उत्पन्न

लोकाधार December 23, 2025

ख्रिस्तीबांधवांच्या ख्रिसमस सणास सुरुवात झाली असून त्यानिमित्ताने खमंग पदार्थांनी शहरातील बेकरी सजल्या आहेत. यात विविध प्रकारांचे केक, मिठाई आणि इतर गोड पदार्थ तयार केले जात आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृहातही बंदींनी या सणानिमित्त गोड पदार्थ बनवले आहेत. हे पदार्थ ठाणे मध्यवर्ती कारागृहासह इतर नऊ ठिकाणी पाठवण्यात आले असून यातून कारागृहाच्या बेकरी विभागाने चार लाख ७७ हजार ३७४ इतके उत्पन्न मिळवून दिले आहे. बंदींच्या हातांना काम देऊन त्यांच्यातील कलाकौशल्य विकसित व्हावे आणि बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या पायावर उभे राहावे, या उद्देशाने ठाणे मध्यवर्ती विभागात कारखाना विभाग सुरू आहे. यात सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी, फरसाण आदी काम सुरू असते. बेड, डायनिंग टेबल, देव्हारे, कपडे शिवणे, बिस्किटे, फरसाण, कापड बनवणे यासारख्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ या कारखाना विभागात बंदी बनवत असतात. विशेषतः दिवाळी-नाताळनिमित्त या बेकरी विभागात विविध फराळाचे पदार्थ तयार केले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या बेकरी विभागात नाताळचे औचित्य साधून कप केक, स्पंज केक, साधे पाव तयार करण्यात आले आहेत. गेल्या सात दिवसांपासून ठाणे कारागृहातील १५ बंदी या कामात गुंतले होते. यात मुंबई मध्यवर्ती कारागृह (आर्थर रोड), तळोजा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह (आधारवाडी जेल), ठाणे मध्यवर्ती कारागृह, सेंटर फॉर पीस ट्रस्ट प्रिझन मिनिस्ट्री इंडिया, सीड आफ होम चॅरिटेबल ट्रस्ट, प्लेवीन संतारिटा प्रिझन मिनिस्ट्री इंडिया- गोरेगाव, संजीवनी फाउंडेशन सामाजिक प्रगती केंद्र, लुईस कम्युनिटी सेंटर- कल्याण येथून या पदार्थांना मागणी आली होती. यात कप केकला मुंबई मध्यवर्ती कारागृह (आर्थर रोड), तर स्पंज केकला भायखळा जिल्हा कारागृह या ठिकाणाहून अधिक मागणी आली. २५,१३६ नग केक कपातून एक लाख ८४ हजार ७५० रुपये, १६ लाख सहा हजार ५०० किलो स्पंज केकमधून दोन लाख ५३ हजार २४ रुपये, तर ९९०० नग साध्या पावांमधून ३९ हजार ६०० रुपये उत्पन्न मिळाले.

Post navigation

Previous: Previous Post
Next: “ठाकरे ब्रॅण्ड” महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा बॅण्ड वाजवणार…

Related Stories

  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

लोकाधार April 16, 2026
  • Blog

प्रेस नोट

लोकाधार April 10, 2026
  • Blog

शासकीय व निमशासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न; ठाणे कॉप्स विजेते

लोकाधार March 31, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • Blog

इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात अव्वल; सुरभी रानडे हिला ९९.६० टक्के

लोकाधार April 16, 2026
  • Blog

प्रेस नोट

लोकाधार April 10, 2026
  • राजकीय

ठामपा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मार्ग मोकळा..

लोकाधार April 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • राजकीय

आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार

लोकाधार April 7, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×