कंत्राटी कामगारांच्या ग्रॅज्युटीतील कोट्यवधींच्या कथित अनियमिततेची चौकशी करा… आमदार संजय केळकर यांची मागणी..
ठाणे :- ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार संजयजी केळकर यांनी बैठक घेऊन प्रशासनाकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
विशेषत :- कंत्राटी कामगारांच्या ग्रॅज्युटी निधीबाबत झालेल्या कथित कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेची स्वतंत्र व सखोल चौकशी तसेच विशेष लेखापरीक्षण (Special Audit) करून ठेकेदार, संबंधित अधिकारी व प्रशासनातील जबाबदार व्यक्तींची भूमिका निश्चित करावी. ग्रॅज्युटीशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार व वैधानिक देयकांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कामगारांच्या हक्काची संपूर्ण ग्रॅज्युटी तातडीने अदा करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.
इतर महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न: बैठकीत ठाणे महानगरपालिका कर्मचारी व कामगारांच्या खालील प्रश्नांवरही तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली :
१. १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना लागू करून आर्थिक लाभ तात्काळ द्यावेत.
२. सातवा वेतन आयोग व १४ महिन्यांचा वेतन फरक सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता तातडीने अदा करावा.
३. शिक्षण विभागातील दिवंगत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्र पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
४. कंत्राटी कामगारांना लागू असलेल्या कामगार कायद्यांनुसार विमा संरक्षण योजना लागू करावी.
५. फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना वारस हक्क योजना लागू करण्याबाबत निर्णय घ्यावा.
६. इंग्रजी माध्यम शिक्षकांचे सेवेत समावेशन करणे बाबत.
७. लिपिकांना वरिष्ठ लिपिक पदांवर पदोन्नती देऊन तात्काळ नियुक्ती करावी.
८. वाहनचालकांच्या वेतन त्रुटी दूर करावी.
९. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम सफल्य योजना अंतर्गत पात्र सफाई कर्मचाऱ्यांना गृहसंकुल उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी.
१०. कळवा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन व बोनसदेयके अदा करावेत. तसेच समान काम समान वेतनातील वेतन फरक संबंधित कामगारांना तात्काळ देण्यात यावा.
“कामगारांच्या हक्कांबाबत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही”
कर्मचारी व कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर प्रशासनाने केवळ आश्वासने न देता कालबद्ध पद्धतीने ठोस निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी भूमिका आमदार संजयजी केळकर यांनी व्यक्त केली.
प्रशासनाकडून या प्रश्नांवर दिरंगाई झाल्यास कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने पुढील भूमिका घेण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस उपस्थित :-
१. सन्माननीय नगरसेवक :-
श्री. विकास पाटील, सौ. उषाताई वाघ, श्री. सुरेश कांबळे.
२. कामगार प्रतिनिधी व पदाधिकारी : –
श्री. विशाल वाघ, श्री. रविंद्र रेड्डी, श्री. राजाभाऊ सोनगडा, श्री. दयाशंकर यादव, श्री. दत्ता घुगे व श्री. अजित मोरे तसेच मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होता.
“प्रशासनाने कामगारांची फसवणूक करून केवळ आश्वासने दिल्यास, येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.”
