Skip to content
Lokadhar News

Lokadhar News

Trending News

१३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान! 1
  • मनोरंजन
  • राजकीय

१३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान!

November 9, 2026
पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर बोगस कर आकारणीचे रॅकेट.. 2
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर बोगस कर आकारणीचे रॅकेट..

November 3, 2026
3
  • राजकीय

November 3, 2026
4
  • ताज्या बातम्या

November 2, 2026
आंदोलकांना अमानुष मारहाण: कापूरबावडी पोलीस स्टेशनसमोर जोरदार आंदोलन 5
  • मनोरंजन
  • राजकीय

आंदोलकांना अमानुष मारहाण: कापूरबावडी पोलीस स्टेशनसमोर जोरदार आंदोलन

November 2, 2026
Primary Menu
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • संपर्क
  • Home
  • राजकीय
  • १३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान!
  • मनोरंजन
  • राजकीय

१३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान!

लोकाधार November 9, 2026

शौर्या अंबुरेची युथ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी

ठाणे, दि.९(जिमाका):- ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोखत येथील प्रतिभावान क्रीडापटू शौर्य अंबुरे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी फडकवली आहे. डकार २०२६ युथ ऑलिम्पिक गेम्समधील महिलांच्या १०० मीटर हर्डल्स (अडथळा दौड) स्पर्धेत शौर्या अंबुरे हिने कांस्यपदकाची कमाई करत संपूर्ण देशासह ठाणे जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. अत्यंत अटीतटीच्या व रोमांचक झालेल्या या स्पर्धेत तिने १३.५९ सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत केवळ पदकच जिंकले नाही, तर १३.७० सेकंदाचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे.
पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अविनाश अंबुरे आणि रूपाली अंबुरे यांची ही कन्या असून, घरच्या संस्कारांमधून मिळालेली जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यशाने ठाणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून संपूर्ण ठाणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
शौर्या अंबुरे हिच्या या प्रेरणादायी यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के आणि समस्त जिल्हा प्रशासन व क्रीडाप्रेमी ठाणेकरांकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील क्रीडा प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
0000000000

Post navigation

Previous: पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर बोगस कर आकारणीचे रॅकेट..

Related Stories

  • ताज्या बातम्या
  • राजकीय

पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर बोगस कर आकारणीचे रॅकेट..

लोकाधार November 3, 2026
  • राजकीय

लोकाधार November 3, 2026
  • मनोरंजन
  • राजकीय

आंदोलकांना अमानुष मारहाण: कापूरबावडी पोलीस स्टेशनसमोर जोरदार आंदोलन

लोकाधार November 2, 2026

जाहिरात ।

Connect with Us |

  • Facebook
  • YouTube
  • instagram

महत्वाच्या बातम्या ।

  • मनोरंजन
  • राजकीय

१३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान!

लोकाधार November 9, 2026
  • ताज्या बातम्या
  • राजकीय

पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर बोगस कर आकारणीचे रॅकेट..

लोकाधार November 3, 2026
  • राजकीय

लोकाधार November 3, 2026
  • ताज्या बातम्या

लोकाधार November 2, 2026
  • Facebook
  • YouTube
  • instagram
Copyright 2025 ©Lokadhar | All rights reserved. | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

WhatsApp

Copy Link
×